उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडून राज्यातील जनतेला रमजान ईदच्या शुभेच्छा

0
15

दि. 30 मार्च 2025.

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडून राज्यातील जनतेला रमजान ईदच्या शुभेच्छा

रमजान ईद प्रेम, शांतता आणि सामाजिक ऐक्याचं प्रतिक ठरो;
मानवकल्याण, विश्वबंधूत्वासह सामाजिक ऐक्याचा संदेश जगाला देऊया
-उपमुख्यमंत्री अजित पवार

मुंबई, दि. 30 :- गुढीपाडवा व मराठी नववर्षा सोबत आलेली रमजान ईद सर्वांच्या जीवनात आनंद, सौख्य, समृद्धी आणि उत्तम आरोग्य घेऊन येवो. समाजात प्रेम, सौहार्द, एकता आणि बंधुत्व अधिक दृढ व्हावे. रमजान ईदच्या निमित्तानं वंचित, गरजू बांधवांना मदतीचा हात देऊन त्यांच्या आनंदात सहभागी होऊया. यंदाची ईदही आपण सर्वांनी एकोप्यानं, आनंदानं आणि उत्साहानं साजरी करुया. परस्परांप्रती सहकार्याची भावना वृद्धिंगत करत सामाजिक ऐक्य अधिक दृढ करुया. मानवकल्याण आणि विश्वबंधूत्वाचा संदेश संपूर्ण जगाला देऊया… अशा शब्दांत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सर्वांना रमजान ईदच्या शुभेच्छा दिल्या आहेत.

रमजान ईदनिमित्त दिलेल्या शुभेच्छा संदेशात उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणतात की, रमजानचा पवित्र महिना आणि त्यानंतर येणारा ईदचा सण सर्वत्र मोठ्या उत्साहानं साजरा केला जातो. मुस्लिम बांधवांसोबतच सर्वधर्मीय नागरिकही या सणाच्या आनंदात सहभागी होतात. गुढीपाडवा व मराठी नूतन वर्षासोबत आलेली यंदाची रमजान ईद वैशिष्ट्यपूर्ण आहे. सध्याच्या काळात समाजात ऐक्य, सहिष्णुता आणि बंधुत्व वृद्धिंगत होणे अत्यंत महत्त्वाचे आहे. रमजान ईद हा सण समाजात परस्परांबद्दल प्रेम, आपुलकी आणि मदतीची भावना वाढवतो. महाराष्ट्रासह देशाच्या सामाजिक ऐक्य आणि प्रगतीसाठी ही बंधुत्वाची भावना अत्यंत आवश्यक आहे, असा विश्वासही उपमुख्यमंत्र्यांनी आपल्या शुभेच्छा संदेशात व्यक्त केला आहे.


Previous articleरमजान ईद निमित्त सर्वांना हार्दिक शुभेच्छा…!
Next articleअज्ञानात सुख असते…
Bhavnagari
मी संपादक श्री.संतोष नारायण शिंदे बारामती इंदापूर भिगवन फलटण सातारा सांगली सह संपूर्ण महाराष्ट्र व विविध राज्यातून भारत देशातून दिल्ली मुंबई नागपूर गोवा विदर्भ पश्चिम महाराष्ट्र खानदेश उत्तर प्रदेश बंगाल विविध राज्यातून भावनगरी या वेबपेजच्या माध्यमातून सामाजिक, सार्वजनिक, सांस्कृतिक, क्रीडा, आरोग्यदायी, शेती, विविध विषयक जनहितार्थ वेब पेज पोर्टल वरती लोकहितार्थ बातमी, लेख जनोपयोगी प्रकारचे कथा-कथन कविता, सांस्कृतिक, क्रीडा विविध विषयावरती लेखन या भावनगरी वेब पेजच्या माध्यमातून जनहितार्थ प्रकाशित करत आहे...

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here