अजित पवार यांच्या हस्ते ‘बारामती पॉवर मॅरेथॉन’चे उद्घाटन
बारामती स्पोर्ट्स फाऊंडेशनच्या वतीने पुनीत बालन ग्रुप प्रस्तुत “बारामती पॉवर मॅरेथॉन सीजन २” चे उद्घाटन आज (१५ डिसेंबर) उपमुख्यमंत्री अजित पवार, खासदार सुनेत्रा पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाले. या आंतरराष्ट्रीय दर्जाच्या मॅरेथॉनला वर्ल्ड ऍथलेटिक असोसिएशनची मान्यता आहे.
४२ किमी, २१ किमी, १० किमी, ५ किमी आणि ३ किमी अशा विविध गटांमध्ये स्पर्धा घेण्यात आली. रनर्ससाठी हायड्रेशन पॉईंट्स, वैद्यकीय मदत, झुंबा आणि वॉर्मअप सत्रे आयोजित करण्यात आली. यंदाची थीम ‘प्राचीन-आधुनिक भारत’ असून जैवविविधतेचे प्रतीक चिंकारा हरीण मॅरेथॉनचे मस्कॉट होते.
कार्यक्रमात ललिता बाबर, आयपीएस कृष्णप्रकाश, अभिनेता जॅकी भगनानी यांसह अनेक मान्यवर उपस्थित होते.
बारामतीमध्ये आज ऐतिहासिक ‘बारामती पॉवर मॅरेथॉन’ (पर्व २) चा उत्साह ओसंडून वाहताना दिसला. या मॅरेथॉनच्या उद्घाटनप्रसंगी महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार आणि खासदार सुनेत्रा पवार, पार्थ पवार यांनी उपस्थित राहून स्पर्धेचा शुभारंभ केला.
मॅरेथॉनसाठी विविध वयोगटातील हजारो धावपटूंनी हजेरी लावली, तर नागरिकांनी देखील मोठ्या प्रमाणावर सहभाग घेतला. अजित पवारांनी धावपटूंना शुभेच्छा देत त्यांच्यात जोश निर्माण केला. या स्पर्धेच्या माध्यमातून फिटनेस आणि आरोग्याचा संदेश देण्याचा प्रयत्न करण्यात आला.
बारामती पॉवर मॅरेथॉन हा उपक्रम नागरिकांच्या शारीरिक व मानसिक आरोग्याला चालना देणारा असून, सतीश ननवरे व त्यांच्या सर्व टीमचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी या उपक्रमाचे विशेष कौतुक केले. बारामतीच्या क्रीडा क्षेत्रातील हा एक महत्त्वाचा टप्पा ठरला असे ही सांगितले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ज्ञानेश्वर जगताप यांनी केले