
‘ इरा ‘ तर्फे ‘ गोल्ड अवॉर्ड ‘ ने ज्येष्ठ पत्रकार मदन (बापू) कोल्हे सन्मानित !
परभणी – सामाजिक व पत्रकारितेचे क्षेत्रामध्ये गेली पाच दशकांपासून पूर्ण वेळ सक्रिय असलेले जेष्ठ पत्रकार मदन (बापू )कोल्हे यांच्या उल्लेखनीय कार्याची दखल घेऊन त्यांना नवि दिल्लीच्या इंडियन रिपोर्टर्स असोसिएशन, ‘ इरा ‘ तर्फे ‘ गोल्ड अवार्ड ‘ देऊन सन्मानित केले आहे.
‘ मानवता’ धर्म पाळत ,सामाजिक कार्याबरोबरच धर्मभूमी वृत्तपत्राचे माध्यमातून,वयाचे अमृतमहोत्सवी वर्ष पार करूनही,आपल्या एकमेव सायकलवरून भ्रमण करीत, समाज बांधवांसोबतच जनतेची सेवा बजावत असलेले परभणीचे जेष्ठ पत्रकार, इंडियन रिपोर्टर्स असोसिएशन महाराष्ट्र चे प्रदेश अध्यक्ष मदन (बापू )कोल्हे

यांना ‘ इरा ‘ तर्फे त्यांच्या उत्कृष्ट कार्याबद्दल ‘ रिपोर्टर ऑफ द एअर ‘ गोल्ड अवॉर्ड देऊन गौरविले आहे, यापूर्वीही 2020 चा ‘ इरा’ तर्फे दिला जाणारा ‘ एक्सलन्स अवॉर्ड ‘ बहाल करून मदन (बापू) कोल्हे यांच्या इरा चे ‘ परभणी जिल्हाध्यक्ष ‘ पदावरील कार्याचा गौरव केलेला आहे.
विद्यार्थी जीवनापासूनच विविध सामाजिक संघटना व पत्रकारांच्या अनेक संघटनाशी सलग्न राहुन पत्रकारांच्या समस्यांचे निवारण आणि सल्लागाराचे निस्वार्थीपणे कार्य पार पाडत आहेत, मदन (बापु )यांच्या निपक्ष,निखळ पत्रकारितेचा आजच्या तरुणाई समोर आदर्श आहे.
मदन (बापु)कोल्हे यांना, अत्यंत मानाचा पुरस्कार बहाल केल्याबद्दल इंडियन रिपोर्टर्स असोसिएशन चे राष्ट्रीय अध्यक्ष राजीव भारद्वाज, व राष्ट्रीय महासचिव मो.जहांगीर यांचे आभार मानून,
राष्ट्रीय पातळीवरील नामांकित मानाचा पुरस्कार मिळाल्याबद्दल मदन (बापू )कोल्हे यांचे मित्र परिवार व हितचिंतकाकडून अभिनंदन केल्या जात आहे.