इएसआयसीने बारामतीत कामगारांसाठी वैद्यकीय सुविधा वाढवाव्यात – धनंजय जामदार

0
59

इएसआयसीने बारामतीत कामगारांसाठी वैद्यकीय सुविधा वाढवाव्यात – धनंजय जामदार

बारामती इंडस्ट्रियल डेव्हलपमेंट असोसिएशनच्या प्रयत्नामुळे ईएसआयसीने बारामतीसाठी 100 बेडचे हॉस्पिटल मंजूर केलेले आहे परंतु या हॉस्पिटलचे बांधकाम पूर्ण होऊन प्रत्यक्ष कार्यान्वित होण्यास मोठा कालावधी लागणार आहे तोपर्यंत ईएसआयसी ने बारामतीत मल्टी स्पेशलिटी हॉस्पिटल बरोबर करार करून या परिसरातील नोंदणीकृत कामगार व त्यांच्या कुटुंबीयांना सर्व प्रकारच्या दर्जेदार वैद्यकीय सुविधा बारामती मध्येच उपलब्ध करून द्याव्यात अशी आग्रही मागणी बारामती इंडस्ट्रीज डेव्हलपमेंट असोसिएशनचे अध्यक्ष धनंजय जामदार यांनी केली आहे.ईएसआयसी संबंधित विविध प्रश्न व समस्या सोडवण्यासाठी वरिष्ठ अधिकाऱ्यांसमवेत बारामती औद्योगिक क्षेत्रात आयोजित केलेल्या बैठकीत धनंजय जामदार बोलत होते.

ईएसआयसी पुणे विभागाचे डेप्यूटी डायरेक्टर पी सुदर्शन, बारामती इंडस्ट्रियल डेव्हलपमेंट असोसिएशनचे अध्यक्ष धनंजय जामदार,उपाध्यक्ष मनोहर गावडे,सचिव अनंत अवचट, खजिनदार अंबीरशाह शेख, सदस्य महादेव गायकवाड,मनोज पोतेकर, हरिश्चंद्र खाडे, हरीश कुंभारकर, राजन नायर ,विष्णू दाभाडे, पियाजो कंपनीचे किरण चौधरी व चंद्रकांत काळे, ईएसआयसी बारामतीचे शाखा व्यवस्थापक दिनेश वाघमारे, डॉक्टर कुंभार, विजय झांबरे, नितांत कोठारी, रघुनाथ दाभाडे, लक्ष्मण वीर,माधव खांडेकर यांचेसह उद्योजक व कंपनी प्रतिनिधी मोठ्या संख्येने या बैठकीस उपस्थित होते.

धनंजय जामदार पुढे म्हणाले ईएसआयसीच्या अनेक योजना आहेत परंतु याबाबत कामगारांमध्ये माहिती नसल्याने ते त्यांच्या हक्काच्या लाभापासून वंचित राहत आहेत याबाबत जनजागृती करणे गरजेचे आहे. तसेच खाजगी हॉस्पिटलमध्ये उपचार घेतल्यास देयकांची प्रतिपूर्ती होण्यास विलंब लागतो तो कमी होणे आवश्यक आहे. बारामती मधील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाबरोबर ईएसआयसीने करार केल्यास कामगारांना स्थानिक पातळीवरच दर्जेदार वैद्यकीय सुविधा प्राप्त होतील यासाठी प्रयत्न करावा असे धनंजय जामदार म्हणाले.

बारामती मध्ये कामगारांसाठी वैद्यकीय सुविधा वाढवण्याची बारामती इंडस्ट्रियल डेव्हलपमेंट असोसिएशनची मागणी रास्त असून या परिसरातील मल्टीस्पेशलिटी हॉस्पिटल समवेत करार करण्यासाठी आपण योग्य ती कारवाई करून तसेच शासकीय वैद्यकीय बरोबर करार होण्यासाठी तांत्रिक बाबी तपासून वरिष्ठ पातळीवर प्रयत्न करू अशी ग्वाही ईएसआयसीचे डेप्युटी डायरेक्टर पी सुदर्शन यांनी उद्योजकांना बैठकीत दिली.

बारामती इंडस्ट्रीयल डेव्हलपमेंट असोसिएशनचे सदस्य हरिश्चंद्र खाडे यांनी आभार मानले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here