आहे हे जिवन नश्वर !परी न कळे माणसातला ईश्वर !

0
43

आहे हे जिवन नश्वर !परी न कळे माणसातला ईश्वर!

२०२५ नववर्षाच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा
सत्ताधिशानो,सत्तेकडे वाटचाल करण्याची मनात विजीगिषु वृती नव्हे प्रवृती असणारे सर्वच राजकर्ते

आपण आपल्या अंतःकरणाशी विचार करा.आपण सत्तेचा राजकारणाचा अमरपट्टा तसेच सजिव प्राणी म्हणुन जगण्याचा अमरपट्टा घेऊन आला नाहीत. सजिव जिवंत असतात.निर्जिव दगड माती असतात.तरी देखील माणसाने माणसाशी माणसासम वागणे हीच अमुची प्रार्थना या ओळी आपल्या कानावर का,पडत नाही.आज सामान्य माणसाचे जगणे आपण माणुस असुन हि कठीण करुन ठेवले.

रस्त्याने चालताना रोड टॅक्स,टोल टॅक्स,ठायी रक्षक असणारे भक्षक टॅफ्रिकेचे लुटारु पोलीस,

कोणत्याही कार्यालयात जा चिरीमिरी दिल्या शिवाय सामान्य माणसाला या देशाचा नागरिक म्हणुन जगता येत नाही.या जाचक अटी तुम्हीच पवित्र अशा विधी मंडळात बसु लाधल्या आहेत ना?कायदा हा न्याय देणारा असला पाहीजे.तरी देखील उपहासाने म्हटले जाते.कायदा हा गाढव आहे.कारण त्याच्या बोकांडी काय-द्यायचे हे राज्य बसले आहे.

सदरक्षणाय खलनिग्रहणाय’ हे महाराष्ट्र पोलिसांचे ब्रीदवाक्य श्रीमद् भागवत पुराण,स्कन्ध दहावा, अध्याय सत्तरावा, श्लोक २७ वा यातील चार पैकी दुसरी ओळ आहे.या धर्मग्रंथातल्या ओळी देखील आपण फाट्यावर मारल्या.असल्यामुळे तेथे रामा,चे उलटे पालटे केले जात आहे.
खल रक्षणाय सदर निग्रहणाय करुन ठेवले आहे.

महाराष्ट्र राज्य पोलीस, आम्ही सर्वांचे, विशेषत: वंचित, दुर्बल, महिला,लहान मुले, अल्पसंख्यांक, जेष्ठ नागरिक, झोपडपट्टीवासी, गरीब आणि समाजातील इतर उपेक्षित समाज घटक यांचेसाठी हे सर्व कागदावर गांधीचा शासकिय छापील कागद दिल्या शिवाय रक्षणाय होत नाही.

जो तेथे गेला तो जिवंत बाहेर येईल की,नाही हि शाश्वती राहीली नाही.कशासाठी पोटा साठी हे सेवा म्हणुन न राहता कशासाठी नोटासाठी,यामुळेच तर हे खाते कोणाकडे हि चढाओढ लागलेली असते.

सामान्य माणसाला द्यावी लागते जगण्याची कसोटी!
राजकारण्याकडे नाही राहिली सचोटी !सारीच खोटी! जमविण्या कोटी कोटी! मरुन जगाव हे कधी ठावुक होणार आहे.

शेतकऱ्यांच्या भाजीच्या देठालाहि हात लावण्याची हिंमत कोणाची होत नव्हती.अशी शिवशाही हि होती.छत्रपती शिवाजी महाराज अजरामर झाले हेच ते मरुन जगाव,येथे तर रोजच शेतकरी कधी मनात तर कधी सरणावर जळत असतो.

अन्न हे पुर्ण ब्रह्म आहे.
“बृृह्” म्हणजे “वाढणे” या धातूपासून हा शब्द सिद्ध झाला आहे.”बृृृृृृहणात् ब्रम्ह “म्हणजे जे वाढलेले आहे असे ,अमर्याद पसरलेले आणि सर्वव्यापी चेतन तत्व म्हणजे ब्रह्म.!शेतकऱ्यांच्या शेतात वाढ हि समजली नाही. त्यामुळे विकास समजला नाही.

उलट पक्षी जिवनदायीनी नद्या गोठवुन टाकल्या. जिवनदायी वृक्षांची तोड केली.खरा वनरक्षक आदीवासी तोच वनवासी केला.

जिझिया कर एक मोगलाने लावला अकबर या मोगलाने रद्द केला.मिठावर कर लावला महात्मा गांधीनी दांडी यात्रा काढताच तो रद्द केला येथे तर महागाईचा कळस रोजच गाठला जात आहे.इकडे आड तिकडे विहिर एकीकडे वाढती महागाई व दुसरीकडे कारखानदारीतली धनदांडग्याची मनमानी दलालाची मनमानी सामान्य जगती दीनवाणी!वरचढ ठरत आहे राजकारण्याची कथनी अन् करणी!

आज जो तो म्हणतो.धर्म संकटात आहे खरा धर्म म्हणजेच सजिव निर्जिव जतन हाच धर्म न कळल्या मुळे,यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारत” यह श्रीमद्भागवत गीतेला श्लोक भावार्थ है कि जब-जब धर्म की हानि और अधर्म की वृद्धि होती है, तब-तब ही भगवान स्वयं को प्रकट करते हैं.भगवानच येथे राउळी मंदीरी कोडुन ठेवला आहे.तो कोठुन प्रकट होणार
उलट पक्षी आम्हाला चिंता पाहीजे या सर्व बेताल सत्तेचा यंत्रणेतुन मानवी जगण्या बरोबरच देश रक्षणाचे काय होणार आहे.

बरबाद गुलिस्ताँ करने को एक ही उल्लू काफ़ी था!हर शाख़ पर उल्लू बैठा है, अंजाम-ए- गुलिस्ताँ क्या होगा? जहाँ डाल डाल सोनेकी चिड़िया बसी रहती है दिन-रात येथे आता चिड़ीया हा चिमुकला जिव पाहणे हि दुरापास्त होत आहे.

या देशात मोगल आले, इंग्रज आले, ताजमहाल लाल किल्ला अनेक वास्तु ,धरणे, जंगल संवर्धन,रेल्वे इत्यादी सुखसोयी त्यांनी केल्या.परंतु जाताना ते वैभव त्यांनी कोणा धन दांडग्याना विकले नाही.तर त्याच्या ऐतिहासिक नोंदी करुन ठेवल्या.भविष्यात आमच्या कोणत्या ऐतिहासिक नोंदी होतील.

आण्णा धगाटे जेष्ठ साहित्यिकाने सामाजिक कार्यकर्त्याने परखड लिहले.तो राष्ट्र दोषी आहे. राष्ट्रद्रोहाचा गुन्हा त्याच्यावर लाधुन हाल हाल करुन मारा, सामान्य माणसाने उठविलेल्या आवाजाचे होईल हा जनहित न ठरता देशद्रोह ठरेल देशात आण बाण न राहता आणी बाणी राहील.
आण्णा धगाटे जेष्ठ साहित्यिक सामाजिक कार्यकर्ता

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here