आनंदवारी

0
67

आनंदवारी

पांडुरंगा भेटाया निघाले
तुकोबा माऊली
विठुरायाच्या दर्शनाची
आस वारकऱ्यांना लागली

ज्ञानोबा माऊली तुकाराम
जयघोष घुमू लागला
विठ्ठल विठ्ठल विठ्ठल
नामाचा गजर झाला

भगव्या रंगाची पताका
खांद्यावर घेऊन पंढरपुरा
चालले वारकरी भक्तगण
संगे माय माऊली घेऊन
चाले डोईवर तुळशी वृंदावन

टाळ मृदंग वाजती
दिंड्या दिंड्यात
वारकरीत तल्लीन
झाले भजन कीर्तनात

धोतरांच्या पायघड्या
अंथरुण काटेवाडीत
पार पडते मेंढ्यांचे रिंगण
बेलवाडीत गोल रिंगणामध्ये
अश्व दौडल्यानंतर ती माती
कपाळी लावाया धावती
अबाल वृद्ध सर्वजण

तुकोबारायांची पालखी
इंदापूरला येते तो दिन
आम्हासाठी महान
सराटीला निरा नदीकाठी
घातले जाते पादुका स्नान

वाखरीला ज्ञानदेव सोपान
निवृत्तीनाथ मुक्ताई भावंडे
एकमेका भेटती
पंढरीनाथा आषाढी
एकादशीला तुझे दर्शन
घेऊन लाखोंची गर्दी
धन्य धन्य होती

माऊली नाचण
इंदापूर,जि.पुणे
8668708351

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here