“आदर्श माता पिता व वीरमाता पिता पुरस्कार वितरण सोहळा “

0
221

प्रतिनिधी :BhavnagaRi

विद्या प्रतिष्ठानचे कमलनयन बजाज अभियांत्रिकी व तंत्रज्ञान महाविद्यालयाचा राष्ट्रीय सेवा योजना विभाग, नवक्रांती सेवाभावी संस्था बारामती यांच्या सयुक्त विध्यमाने “आदर्श माता पिता व वीरमाता पिता पुरस्कार वितरण सोहळा ” यशस्वीरीत्या संपन्न.
विद्या प्रतिष्ठानचे कमलनयन बजाज अभियांत्रिकी व तंत्रज्ञान महाविद्यालयाचा राष्ट्रीय सेवा योजना विभाग व नव क्रांती सेवाभावी संस्था बारामती, यांच्या सयुक्त विध्यमाने दिनांक १४ फेब्रुवारी २०२३ रोजी महाविद्यालयाच्या मुख्य सभागृहामध्ये हा उपक्रम राबविण्यात आला. या कार्यक्रमासाठी प्रमुख अतिथी मा. श्री. धनंजय जामदार (अध्यक्ष बारामती इंडस्ट्रीयल असोसिएशन), मा. श्री. रमाकांत गायकवाड (विभाग नियंत्रक रा. प. पुणे) मा. श्री. पांडुरंग वाघमोडे (ग्रामीण कलाकार), मा. श्री. निलेश काटे (सरचिटणीस राष्ट्रीय युवक कॉंग्रेस सातारा), मा. श्री. कोंडू तात्या (रिल्स स्टार शेतकरी पुत्र), श्री पियुष सजगने (रिल्स स्टार) तसेच प्राचार्य डॉ. श्री. रा. स. बिचकर हे मान्यवर या कार्यक्रमास उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या सुरुवातीला व्यासपीठावरील मान्यवरांच्या हस्ते राष्ट्र पुरुषांच्या प्रतिमेचे पूजन करून त्यांना पुष्पहार अर्पण करण्यात आला व दीपप्रज्वलन करण्यात आले. त्यानंतर व्यासपीठावरील मान्यवराना सन्मानित करण्यात आले. या संपूर्ण कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रत्नावली घोगरदरे व या कार्यक्रमाचे सर्वेसर्वा श्री. चक्रपाणी चाचर यांनी केले. या कार्यक्रमाचा मुख्य उद्देश हा समाजातील उपेक्षित, कष्टकरी व अत्यंत बिकट परिस्थितीतून कणखरपणे उभ्या राहिलेल्या व समाजासाठी आपले जीवन आदर्शवत व समाजासाठी प्रेरणा देणारे ठरणाऱ्या समाजतील तळागाळातील सर्वसामान्य माणसाचा व त्याच्या कार्यकर्तृत्वाचा गौरव करणे हा होता. या कार्यक्रमामध्ये आदर्श माता पिता हा पुरस्कार-सुनंदा तावरे, श्री. व सौ. सविता तेली, विमल बनकर, कलावती धाईंजे, श्री. व सौ. रुख्मिणी दिलीप धोंडिबा गरदडे, जयश्री जाधव, हवाईबाई माने, विश्वनाथ भोसले, सुनंदा केकाण, श्री. व सौ. मंदा बापूराव रंगनाथ थोपटे, श्री. व सौ. मनीषा संजय निवृत्ती शिंदे वीर माता पिता हा पुरस्कार श्री. व सौ. विजया बापूराव किसन इंगवले यांना तसेच वीर पत्नी पुरस्कार सुनंदा लालासो नाळे यांना, समाजरत्न पुरस्कार राहुल बनकर, कर्तबगार महिला सन्मान पुरस्कार जुई माने यांना गुणवंत लेखक पुरस्कार सचिन तावरे यांना. आदर्श ग्रामिण कलाकार पुरस्कार कोंडू तात्या (रिल्स स्टार शेतकरी पुत्र), पांडुरंग वाघमोडे (ग्रामिण कलाकार), पियुष सजगने (रिल्स स्टार) यांना, आदर्श/गुणवंत शिक्षक/ शिक्षिका पुरस्कार- जयश्री धाइंजे व डॉ . रमेश देवकाते यांना उदोजक पुरस्कार रमेश निंबाळकर व वामन गरुड यांना आदर्श सरपंच अमोल चव्हाण, विशेष सेवा पुरस्कार जीवन गौरव सेवाभावी प्रतिष्ठान देऊळगाव रसाळ यांना जीवन गौरव पुरस्कार डॉ . आर. एस. बिचकर यांना देण्यात आला. या सर्वाना प्रमाणपत्र, मानचिन्ह, मूर्ती व छोटेसे रोपटे देवून हा पुरस्कार मान्यवरांच्या हस्ते प्रधान करण्यात आला. या सर्व पुरस्कार्थींनी आपले मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी मा. श्री. धनंजय जामदार यांनी आपल्या मार्गदर्शनपर भाषणात समाजातील तळागाळातील या लोकांना शोधून त्यांच्या कार्याचा गौरव केल्याबद्दल विद्या प्रतिष्ठानचे कमलनयन बजाज अभियांत्रिकी व तंत्रज्ञान महाविद्यालय, व नवक्रांती सेवाभावी संस्था बारामती यांचे आभार मानले. व या सेवाभावी संस्थेला भरीव स्वरूपाची आर्थिक मदत देण्याचे आश्वासन दिले. तसेच चक्रपाणी चाचर यांनी राज्य परिवहन महामंडळाची एसटी (लालपरी) वाचविण्यासाठी बारामतीच्या उद्योग क्षेत्रातील सर्व उद्योजकांनी महिन्यातून एकदा दोनदा अष्टविनायकाची सहल आयोजित करावी कि ज्यामुळे एसटी महामंडळाचे उत्पादन वाढेल या साठी त्यांनी या कार्यक्रमाच्या माध्यमातून बारामती इंडस्ट्रीयल असोसिएशनचे अध्यक्ष धनंजय जामदार यांना आव्हान केले. कार्यक्रमासाठी सहाय्यक प्राध्यापिका पल्लवी बोके व सहाय्यक प्रा. दीपक सोनवणे यांचे सहकार्य लाभले. या कार्यक्रमासाठी डॉ. श्री. परशुराम चित्रगार प्रसारमाध्यम विभागाचे श्री. सुनिल भोसले हे उपस्थितीत होते. शेवटी वंदे मातरमने कार्यक्रमाची सांगता करण्यात आली. या कार्यक्रमासाठी संस्थेच्या विश्वस्त सुनेत्रा पवार, उपाध्यक्ष ॲड. श्री. अशोक प्रभुणे, सचिव ॲड. निलीमा गुजर, खजिनदार श्री. युगेंद्र पवार, विश्वस्थ डॉ. राजीव शहा, श्री. किरण गुजर मंदार सिकची, रजिस्टार कर्नल श्री. श्रीश कंभोज या सर्वांचे महत्वपूर्ण मोलाचे मार्गदर्शन व सहकार्य लाभले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here