आण्णा भाऊसाठे यांची जयंती…विनम्र अभिवादन..!

0
165

आण्णा भाऊची जयंती, जयंती करा साजरी! वाटचाला हो,चाला हो प्रतिमा त्यांची घेऊन शिरी!✒️ जगी होऊन गेले साहित्य रत्न आण्णा! त्यांचा आदर्श‌ घेऊन तुम्ही लिहायला शिकना!✒️

वारणेच्या खोऱ्यातल गाव नाव त्याचं वाटेगाव! जगाच्या नकाशावर,आण्णा भाऊनी गाजवल,जगाला झालं ठाव!✒️ नाही बसले गावाकड वळीत चऱ्हाट! कथा कादंबऱ्या शाहीरी लिहुन उगवली पहाट!✒️

नाही बसले गावाकड, फुकत बेंडबाजा ! गावाकडच्या लिहुन कथा केला त्याचा गाजावाजा!✒️

नाही घाबरले जगण्याच्या अडीअडचणीला! गुलाम होऊन नाही जगले धनदांडग्याच्या वळचणीला!✒️ वाटेगाव ते ममई पायी ते चालले! दादा बाबा,लाचारीने नाही कोणाच्या मोटारगाडीत बसले!✒️ नाही धरली मोहमाया लबाडीच्या हवेली माडीची!

दुखिताच्या पीडितांच्या संगे, चिराग नगरात,शान राखली झोपडीची!✒️ जरी होती ठेंगणी कृष्ण वर्णी काया! सन्मानान इमानात बसुन पाहुणे म्हणुन गेले रशिया!✒️ रशियाचा महान साहित्यिक मॅक्सिम गौर्की ! आण्णा भाऊना मिळाली उपाधी इतिहासात नावलौकिकी!✒️ नाही पाळला धर्म पंथ जातीभेद! रावा पासुन रंका पर्यत नायकाची लिव्हली उमेद!✒️ कुंभजच्या सत्तु भोसल्यांची दावली ती वगरग! लिव्हली त्याची कादंबरी वारणेचा वाघ!✒️

नाही गेलेत शाळेत नाही गिरवली अक्षर ! करुन समिक्षा होण्या विद्यावाचस्पती कैकाना केले साक्षर!✒️ संयुक्त महाराष्ट्राची पाहुन ती चळवळ ! मारून थाप डफावर ,गाऊन पहाडी ललकार लढ्या आणले बळ!✒️ चिखलातल कमळ,चित्रा लाडी आवडी वैजयंता! लढणाऱ्या नारी जातीची लिव्हली त्यांनी महानता!✒️ गावगाड्यासाठी परक्या गावातल्या आणण्या जोगणी!✒️ बाजी जिवाची लावुन राणोजी लढले रणांगणी!✒️

गोऱ्या इंग्रजांचा खजिना लुटून लढणारा! तरुणांनो घ्यारे प्रेरणा वाचुन कादंबरी फकीरा!✒️ किती महान त्यांच्या साहित्याच भांडार! बावीस देशात गेले सातासमुद्रापार!✒️ वालुआई,भाऊंचे तुकाराम हे पुत्ररत्न! नाव बापाचं संगतीला घेऊन आण्णा भाऊ झाले साहित्यरत्न!✒️ लढवय्ये झाले आण्णा भाऊ पिऊन फकीराच्या,लुटीच्या घुटीन! चला करु विनम्र अभिवादन फकिरा होऊन एकजुटीन!✒️

धनदांडग्यांना,लबाड लांडग्याना,नियमावली डावलुन दिले भारतरत्न! राज्यकर्त्यांनो जना मनाची जाणुन सांगा केव्हा देणार भारतरत्न!✒️

आण्णा धगाटे जेष्ठ साहित्यिक सामाजिक कार्यकर्ता

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here