आचार्य अॅकॅडमीत रंगला स्पोर्टस कार्निव्हल
आठवीच्या मुलींनी दहावीच्या टीमला कब्बडीत हरवले तर आठवीच्या मुलांनी दहावीच्या मुलांना बुद्धीबळात मागे टाकले. आठवीत असलेल्या पृथ्वीराज ढवळेने मुलांमध्ये तर आठवीतील आदिती ठोंबरे आणि अनुजा दाभाडे यांनी मुलींमध्ये बेस्ट स्पोर्ट्स पर्सनचा किताब पटकावला. सेजल धायगुडे या मुलीने सलग १३२ सुर्यनमस्कार घालून या स्पर्धेत अव्वल नंबर पटकावला. अशा अनेक रंगात १७२९ आचार्य अॅकॅडमीचा पहिला स्पोर्ट्स कार्निव्हल रंगून निघाला.
लिंबुचमचा, संगीत खुर्ची, सुर्यनमस्कार स्पर्धापासून गोळाफेक, कब्बडी, खोखो, १०० मीटर व ४०० मीटर धावण्यासारख्या मैदानी खेळांच्या स्पर्धांपर्यंत एकुण १२ खेळ या स्पर्धेत खेळले गेले. यामध्ये आचार्यच्या १०० हून जास्त मुलींनी व २२० पेक्षा जास्त आठवी ते दहावीच्या मुलांनी सहभाग घेतला. प्रत्येक वर्गाच्या मुलांच्या ४ टीम व मुलींच्या ४ टीम अशा एकुण २४ टीम या स्पर्धेत खेळल्या.
इंजिनिअर किंवा डॉक्टर होण्यासाठी सततचा अभ्यास करणाऱ्या मुलांना या स्पर्धेमुळे नवचैतन्य मिळाले. त्यांच्यातील सुप्त गुणांना यातून वाव मिळाला असे सीईओ नीलेश बनकर यांनी सांगितले. संस्थापक ज्ञानेश्वर मुटकूळे, संचालक सुमीत सिनगारे, कमलाकर टेकवडे आणि प्रवीण ढवळे यांनी यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले. १७२९ आचार्य अॅकॅडमीच्या मुक्ती विंगचे शाखा व्यवस्थापक संदीप सोनावणे आणि त्यांच्या टीमच्या उत्तम नियोजनाने हा कार्निव्हल उत्साहात पार पडला.