आज पुन्हा.. साहेब, दादा, ताई…. एकाच … स्टेजवर राजकारणात सर्वकाही अलबेल…. प्रसंग विद्या प्रतिष्ठानचे अनंतराव पवार इंग्लिश मीडियम स्कूल या नूतन वास्तूचा उद्घाटन नामकरण उद्घाटन…!
संतोष शिंदे :-baramati:
सर्वसामान्यांना
म्हणतात ना राजकारण… नाही.. राव कळत..
विषय तसाच आहे.
आज राष्ट्रवादीचे आदरणीय ज्येष्ठनेते खासदार शरद पवार साहेब व राष्ट्रवादीतून फूट पडून राष्ट्रवादीचेच महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार, खासदार सुप्रिया सुळे.. दौंड तालुक्यात भिगवन नजीक विद्या प्रतिष्ठान इंग्लिश मीडियम शाळेचे उद्घाटनाच्या कार्यक्रमास आज दि.२२ रविवार रोजी दुपारी ३ वाजता पुन्हा एकदा.. साहेब ,दादा, ताई एका स्टेजवर येणार त्यामुळे बारामतीतील सर्वसामान्य सर्व कार्यकर्त्यांच्या व राष्ट्रवादीच्या सहकाऱ्यांच्या भवया मात्र नक्कीच उच्वलेल्या आहेत हे मात्र नक्कीच…!
तीन महिन्याच्या कालावधीनंतर आता पुन्हा साहेब दादा ताई एका स्टेजवर या कार्यक्रमाच्या निमित्ताने येत असल्याचे समजल्यामुळे पुन्हा एक वार बारामतीत आनंदाचे वातावरण निर्मिती झालेली आहे व सर्व एकच आहेत हे चाललेले आहे .
ते केवळ राजकारण आहे अशाची ही चर्चा शहरात विविध चौकात पुन्हा ऐकायला मिळत आहे कार्यकर्त्यात मात्र संभ्रम होता तो दूर झाल्याचे ही बोलले जाऊ लागलेले आहे तरी चर्चा सुरू झाली आहे राजकारण काहीही असो ,
आज रविवार 22 ऑक्टोबर रोजी शरद पवार साहेब अजित दादा सुप्रिया सुळे हे दौंड तालुक्यातील विद्या प्रतिष्ठानचे अनंतराव पवार इंग्लिश मीडियम स्कूल या नूतन वास्तूचा उद्घाटन नामकरण उद्घाटन…! ला उपस्थीत असणार आहेत यावरून अर्क तर्क पुन्हा सुरू झालेले आहेत.
हे मात्र नक्कीच तर परवाच सुप्रिया सुळे यांनी देखील म्हटले की दिवाळीच्या पाडव्यालाही सर्व पवार कुटुंब एकत्रित दिवाळी साजरी करणार आहोत. असेही सुप्रियाताई सागितले होते.
त्यात राजकारण आणता कामा नये यावरून राजकारणात सर्व काही कालवेल वेगवेगळ्या असते मात्र प्रत्यक्षात राजकारण हे विचारांचे असायला हवे तो विचार दिसून येतो आहे…!