आई माझी… मायेचा सागरु….!

0
66

आई माझी… मायेचा सागरु….! माझी आई कै. सुशीला नारायण शिंदे साधी भोळी दमान धीराची सुसंस्कृत न शिकलेली पण सर्वांना सुशिक्षित करणारी, आई कशी असावी हे आम्हा लेकरांना तर सर्व नातेवाईकांना हितचिंतकांना गावकरी मंडळींना तालुक्यातील लोकांना जिल्हाभर ती जिथे जिथे जाईल तिथे तिथे तिचे कार्य कर्तुत्व सिद्ध करत राहिली ती एका जोमान आपले कार्य पुढे पुढे नेत राहिली साधी भोळी आई परंतु उच्च विचारसरणी मनात कसलेही कपट न पाळणारी सर्वा परी चराचरात सर्वांचे हित पाहणारी, जोपासणारी, कायम दुःख दारिद्र्यात जीवन जगत आयुष्याची रूपरेषा काढणण्यात पाणावल्या डोळ्यांनी सर्वांकडे पाहीले, परंतु ती कोणाला कळलीच नाही अशी माझी साधी भोळी आई… लहानपणीच लग्न, वडील तामसी,रागीट, महाराज ,बुवा ,कारागीर ,बापू, नारायण, देवा विविध नावाने संबोधले जाणारे निर्मळ स्वभावाचे वडील त्यांची ही सुशीला अर्धांगिनी.. पुढे तीन आपत्य जन्माला आली थोरला मुलगा संतोष मधवा विनोद लहाना ज्ञानेश्वर तीन अशी अपत्य.. मुळगाव विडा तालुका केज जिल्हा बीड.. तीन सुना नातवंड नाती सर्व काही तिच्या पदरात पडले. काही काळ तालुका केज मध्ये राहण्याचा योग आला. परत विड्याला… मोठा मुलगा बारामतीला एक बीडला काही दिवस. कधीही एक ठिकाणी असे बसतान नाही.. झाले. संसार ठीक ठिकाणी मांडताना काही संसारिक अडीअडचणीचा सामना करताना.. सर्वांच्या पुढे पुढे करत आईने जीवन आपले व्यतित करावे.. कुठलीही मनी अशा न बाळगता सर्वकाही दुःख दारिद्र्याच्या तिच्या वाट्याला आल्यात की काय असेच तिचे जीवनमान राहिलेले आहे. शेवटी ससून रुग्णालय येथे गेल्या दोन महिन्यापासून उपचार सुरू असताना त्यात तिचे निधन झाले एवढ्या मोठ्या वेदनामुळे जीवन तिने सहन केले का रे देवा एवढे दुःख तिच्या वाट्याला तू दिलेस कशासाठी या भोळ्या बावड्या जीवाला तू का नाही समजून घेतलेस असा प्रति प्रश्न या देवाकडे ही मुलगा संतोष व त्याच्या माझ्या आईचा देखील आहे…देव बाप्पाला……..!
लहानपणापासून काबाड कष्ट आई-वडिलांच्या काळात कबाड्ड कष्ट नवऱ्यांच्या काळात कबाड कष्ट मुलांच्या काळातही तिनं केलंच कष्ट आयुष्य कष्टातून सरत असताना जेव्हा कितीतरी वर्षांनी आज मिथीस सुखाचे दोन घास तिला मिळणार होते. त्याच टायमात काळाने तिच्यावर घाव घातला हे किती तिचे दुर्भाग्य म्हणावे लागेल. दोन दीर ,दोन जावा, पुतणे, पुतण्या ,भाऊ , बहिणी,भाव् जया,भाचे ,भाची आज तीन मुलं तीन सुना नातवंड नाती पत्रुंड असा परिवार होत.
आईच्या व वडिलांच्या काळात दोघांनीही शेती केली शेतीमध्ये कवाड कष्ट केले शिवाय विविध ठिकाणी कामे केली रोजी रोजगार केले वडिलांनी दुकानदारी केले कारागिरी केली, पहिलवान, वस्ताद , ह भ प झाले. आधी सर्व करून शेवटी गळ्यात फास लावून घेतला.. २४ वर्ष होत आले या विषयाला तेव्हापासून माझ्या आईने संसारिक जिम्मेदारी स्वतःच्या खांद्यावर घेत दोन भावाला सहानभूती पर आशीर्वाद देत त्यांचे संसार पुढे नेण्यास कारणीभूत ठरत व मोठ्या मुलाच्या साह्याने घर संसार कसा पुढे नेता येईल याकडे तिचे जास्तीत जास्त लक्ष होते. या सर्व अडीअडचणीच्या काळात ही तिने तग धरून मुलांच्या खांद्याला खांदा देत जीवनाचे धडे गिरवत गिरवत आज मितिस सर्वकाही ठीक होत असताना काही मानसिक त्रास आणि ग्रासून गेलेली माझी आई आत मधून खरोखरच खचली होती ,परंतु तिने सर्वांना धीर द्यायचा एवढेच ठरवलं होतं की काय शेवटपर्यंत तुझं चांगलं होईल त्याचं चांगलं होईल सर्वांचं चांगलं होईल अशीच बोलत राहिले. माझे आशीर्वाद आहेत हे शेवटचे वाक्य, मी कोणाचे वाटोळे केले नाही माझे का वाटोळे होईल, देव माझी अशी का परीक्षा घेतो हे देवाकडे तिचे निमित विचारत राहिली……!

कष्टातूनही केली आयुष्याची सुरुवात… सर्वावर फिरविला मायेचा हात….

सुख जवळ येताच काळाने फिरवली पाठ….. सर्वांसाठी देह जिजविला…. कष्टातून आनंद पुरविला…. ज्योत अनंतात विलीन झाली.

स्मृति आठवणींना दाटून आली सहवास जरी सुटला स्मृती सुगंध देत राहील….

आयुष्याच्या प्रत्येक वळणावर …आठवण आई….

तुझी येत राहील .आई…

क्षणोक्षणी आमच्या मनी तुझीच राहील आठवण हीच आमच्या आईची जीवनातील अनमोल अशी साठवण… आई….!!!!!
!! भावपूर्ण श्रद्धांजली!!🪔🙏❤️🪔

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here