विद्या प्रतिष्ठानचे कमलनयन बजाज इन्स्टिट्यूट ऑफ इंजिनिअरिंग अँड टेक्नॉलॉजी या महाविद्यालयात संगणक अभियांत्रिकी विद्यार्थी संघटना (CESA) मार्फत शिक्षक दिन उत्साहात साजरा
विद्या प्रतिष्ठानचे कमलनयन बजाज अभियांत्रिकी व तंत्रज्ञान महाविद्यालय संगणक अभियांत्रिकी विद्यार्थी संघटना यांच्या वतीने आज दिनांक १४ सप्टेंबर २०२३ रोजी शिक्षक दिन महाविद्यालयाच्या मुख्य सभागृहांमध्ये साजरा करण्यात आला. कार्यक्रमाची प्रस्तावना नेहा छाजेड, अनुष्का शहा, प्रथमेश शिंदे, या विद्यार्थ्यांनी केली. कार्यक्रमाची सुरुवात एका सुंदर हिंदी गीताने केली. कार्यक्रमाच्या सुरुवातीला अनुराग दहिंजे, राधिका आकारे या विद्यार्थ्यांनी आपले मनोगत व्यक्त केले. प्रत्येक विद्यार्थ्याच्या जीवनात त्याच्या शिक्षकांचे असणारे अनन्यसाधारण महत्त्व याचे या सर्व विद्यार्थ्यांनी विश्लेषण केले. त्यानंतर संगणक अभियांत्रिकी विद्यार्थी संघटनेच्या विद्यार्थ्यांनी महाविद्यालयातील संगणक विभागाच्या प्राध्यापकांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. या कार्यक्रमांमध्ये फिश पॉइंट तसेच नृत्य या संस्कृती कार्यक्रमांचा कलाविष्कार दाखवण्यात आला. या संपूर्ण कार्यक्रमाचे आयोजन संगणक अभियांत्रिकी विद्यार्थी संघटना यांच्या सर्व विद्यार्थी सदस्यांनी अत्यंत उत्कृष्ट पद्धतीने केले होते. या कार्यक्रमासाठी संगणक विभागातील सर्व विद्यार्थ्यांनी अत्यंत हिरारीने सहभाग घेतला होता. या कार्यक्रमासाठी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. आर. एस. बिचकर संगणक विभागाचे विभाग प्रमुख डॉ. चैतन्य कुलकर्णी तसेच संगणक विभागाचे सर्व प्राध्यापक वर्ग, या सर्वांचे उपस्थितीत हा कार्यक्रम अत्यंत नियोजनबद्ध पद्धतीने पार पाडला.
अभियांत्रिकी विद्यार्थी संघटना (CESA) मार्फत शिक्षक दिन उत्साहात साजरा
अभियांत्रिकी विद्यार्थी संघटना (CESA) मार्फत शिक्षक दिन उत्साहात साजरा