अभिनेत्री श्वेता भामरे यांचा मराठी चित्रपट २६ डिसेंबर २०२५ रोजी संपूर्ण महाराष्ट्रात सावित्री कलयुगातली हा चित्रपट रिलीज होणार
प्रतिनिधी सोनाली मोरे
मराठी सिनेमा सावित्री कलयुगातली ह्या मराठी चित्रपटांचे वैशिष्ट्य अस आहे की आपल्या रूढी परंपरा जोपासत जुन्या नव्या ची सांगड घालत भावनात्मक सिनेमा बनवला आहे. सावित्री कलयुगातली हा मराठी आपल्या महाराष्ट्रामध्ये वटसावित्री पूजेचा म्हणून हा सण साजरा केला जातो .म्हणून सगळ्यांनाच सत्यवानाची सावित्री माहित आहेच. आजही स्त्रिया किती मॉडर्न झाल्या तरी वटसावित्रीची पूजा करतात. पती-पत्नीचे नातं जपणारा हा सण . आई-वडिलांच्या अती लाडामुळे किंवा कधी कधी मुलाच्या बऱ्याचश्या चुकांवर आई पांघरून घालते आपल्या लाडाच्या पदराखाली आपलंच मूल बिघडते हे कदाचित तिच्या लक्षात येत नसते म्हणूनच की काय घटस्फोटाचे प्रमाण जास्त वाढलेत , म्हणून आम्ही सामाजिक बांधिलकी म्हणून संदेश देऊन कुटुंब व्यवस्थेला हातभार लावणे साठी हा एक प्रयत्न आहे. पण तरीही प्रत्येक स्त्री आपल्या पतीच्या संकट समई आपल्या पतीसोबत सत्यवानाच्या सावित्री सारखी उभी राहते. मुलावर जर संकटाची अशीच काही वेळ आली तर ,आई वडिलांची माया सुद्धा त्याच्या पाठीशी उभी राहते. असंच काहीसं या चित्रपटात तुम्हाला पाहायला मिळेल. निर्माता खानदेश सुपुत्र कराटे मास्टर नानासाहेब बच्छाव निजामपूर (धुळे) जय मल्हार एंटरटेनमेंट वर्ल्ड व एसपी एंटरटेनमेंट वर्ल्ड यांचा पहिला मराठी चित्रपट सावित्री कलयुगातली.कथा पटकथा दिग्दर्शन प्यारेलाल शर्मांचे आहे.सह निर्माती धनश्री बच्छाव, सहनिर्माता रवी कुमार तर चित्रपटाच्या लीड रोल मध्ये अभिनेता पवन चौरे व अभिनेत्री महेक शेख मुख्य भूमिकेत आहेत.नकारात्मक मुख्य भूमिकेत आहेत श्री जयराज नायर व खलनायकच्या रोलमध्ये नानासाहेब बच्छाव यांनी काम केले आहे . मुख्यभूमिकेत अभिनेत्री श्वेता भामरे आहे , निशान पवार रवी कुमार श्री जी एस पाटील श्री राकेश शिर्के डॉ .अविनाश पाटील किरण ब्राम्हणे व बालकलाकार नमो तर चित्रपटाचे संवाद लेखन सुजाता पवार राकेश शिर्के यांचे आहे.
सावित्री कलयुगातील हा मराठी चित्रपट २६ डिसेंबर 2025 रोजी रिलीज होत आहे. सगळ्यांनी थेटरला जाऊन एकदा पाहवा .
या चित्रपटामध्ये मला लीड रोल करण्याचे योग आला असे आभिनेत्री श्वेता भामरे यांनी सांगितले .आयुष्यात या चित्रपटामुळे खूप काही शिकायला मिळेल आणी आदर्श घेण्यासारखा चित्रपट आहे . या चित्रपटाची कहाणी चांगली आहे ,गाणी पण एका हून एक भारी आहे .मनाला वेड लावणारा आहे हा चित्रपट आहे. चित्रपट गृहात जावून सर्वांनी पाहावा . राज्यवन मंत्री आदरणीय गणेशजी नाईक यांनी या चित्रपटाचे ट्रेलर पोस्टर लॉन्च केले व शुभेच्छा दिल्या . दिग्दर्शक प्यारेलाल शर्माने साहेबांनी या चित्रपटासाठी खूप मेहनत घेतली आहे. अखेर त्यांनी २६डिसेंबर २०२५रोजी रिलीज होणार आहे असे जाहीर केले.



