अनेकान्त इंग्लिशमिडियम स्कूलमध्ये विज्ञान दिनाचे औचित्य साधून विविधवैज्ञानिक प्रकल्प व वार्षिक प्रदर्शनाचे आयोजन

0
15

बारामती, दि. २८/०२/२०२५ येथील अनेकान्त इंग्लिश
मिडियम स्कूलमध्ये विज्ञान दिनाचे औचित्य साधून विविध
वैज्ञानिक प्रकल्प व वार्षिक प्रदर्शनाचे आयोजन करण्यात
आले. या प्रदर्शनाचे उद्घाटन डॉ. सौ. जुई चिराग
शहा(मुंबईकर) व श्री. भारत काळे यांच्या हस्ते करण्यात
आले. याप्रसंगी शाळेतील इयत्ता ३ री ते ८ वीच्या
विद्यार्थ्यांनी विविध प्रयोगांचे सादरीकरण केले. शाळेतील
विद्यार्थ्यांनी तसेच पालकांनी या प्रदर्शनात सहभागी होऊन
सादरीकरण करण्यात आलेल्या प्रयोगांना भेट देऊन त्याची
माहिती जाणून घेतली. प्रयोगांमध्ये रोबोट, सौर यंत्रणा,
औद्योगिक प्रदूषण, रक्ताभिसरण प्रणालीचे कार्य मॉडेल,
उत्सर्जन प्रणाली, हृदय, सूर्यग्रहण, भाषा-व्याकरण मॉडेल,
नफा, तोटा मॉडेल, कोन मॉडेल, घाऊक, किरकोळ बाजार
या प्रकारचे एकूण ५० प्रयोग प्रदर्शनात ठेवले होते.
या प्रदर्शनात विद्यार्थ्यांनी आपल्या सृजनशीलतेचा अनोखा
आविष्कार सादर करत विविध वैज्ञानिक प्रकल्प सादर केले.
या उपक्रमाने विद्यार्थ्यांमधील संशोधन वृत्तीला चालना
मिळाली.

विद्यार्थ्यांनी कल्पकतेने सादर केलेले प्रकल्प पाहून उपस्थित
पालक आणि शिक्षक वर्गही प्रभावित झाले.
विद्यार्थ्यांच्या मेहनतीला दाद देत शालेय व्यवस्थापन
समितीने त्यांचे विशेष कौतुक केले. स्कूलच्या प्राचार्यांनी
विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करणाऱ्या शिक्षकांचे आणि सहभागी
विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले.
या कार्यक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये विज्ञानाची गोडी
निर्माण होऊन संशोधनाची आवड वाढेल, असा विश्वास
शाळा व्यवस्थापनाने व्यक्त केला.

Previous articleमोफत जलनेती प्रशिक्षण शिबीर
Next articleरोटरी क्लब पुणे फॉरच्यूनची आढावा बैठक संपन्न…!
Bhavnagari
मी संपादक श्री.संतोष नारायण शिंदे बारामती इंदापूर भिगवन फलटण सातारा सांगली सह संपूर्ण महाराष्ट्र व विविध राज्यातून भारत देशातून दिल्ली मुंबई नागपूर गोवा विदर्भ पश्चिम महाराष्ट्र खानदेश उत्तर प्रदेश बंगाल विविध राज्यातून भावनगरी या वेबपेजच्या माध्यमातून सामाजिक, सार्वजनिक, सांस्कृतिक, क्रीडा, आरोग्यदायी, शेती, विविध विषयक जनहितार्थ वेब पेज पोर्टल वरती लोकहितार्थ बातमी, लेख जनोपयोगी प्रकारचे कथा-कथन कविता, सांस्कृतिक, क्रीडा विविध विषयावरती लेखन या भावनगरी वेब पेजच्या माध्यमातून जनहितार्थ प्रकाशित करत आहे...

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here