अनेकान्तच्या सौ. आरती पाटील यांचे जिल्हास्तरीय यश….
बारामती. दि ०६/०४/२०२५ रोजी जिल्हास्तरीय
पॉवरलिफ्टिंग निवड चाचणी तळेगाव, दाभाडे, पुणे येथे संपन्न
झाली. या स्पर्धेत अनेकान्त इंग्लिश मिडियम स्कूलच्या क्रीडा
शिक्षिका सौ. आरती वैभव एकाड पाटील यांनी मास्टर वन या ७६
वजनी गटात प्रथम क्रमांक प्राप्त केला. त्यांची राज्यस्तरीय पॉवर
लिफ्टिंग स्पर्धेत निवड करण्यात आली. त्यासाठी त्यांनी अथक
परिश्रम घेतले.
त्यांच्या उत्तम प्रदर्शनाबद्दल स्कूलचे अध्यक्ष श्री. चंद्रवदन
शहा (मुंबईकर), शाळा व्यवस्थापन समितीचे सर्व सदस्य तसेच
स्कूलच्या प्राचार्या यांनी कौतुक करत पुढील वाटचालीसाठी
शुभेच्छा दिल्या.
