अनंत आशा नगर मधील नागरिकांच्या समस्या लवकरात लवकर मार्गी लावणार : जय पाटील

0
206

अनंत आशा नगर मधील नागरिकांच्या समस्या लवकरात लवकर मार्गी लावणार : जय पाटील

बारामती (दि:१२)

अनंत आशा नगर मधील नागरिकांच्या समस्या लवकरात लवकर मार्गी लावणार असल्याचे प्रतिपादन राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे शहराध्यक्ष जय पाटील यांनी केले.

एक तास राष्ट्रवादी काँग्रेस पक्षासाठी या उपक्रमा अतंर्गत प्रभाग क्रमांक १२ अनंत आशा नगर या ठिकाणी बारामती शहर होलार समाजाच्या वतीने रेश्माताई ढोबळे व सुरज देवकाते यांनी (दि:१२) रोजी कार्यक्रम आयोजित केला होता. या दरम्यान जय पाटील बोलत होते.

या प्रसंगी बारामती सहकारी बँकेचे चेअरमन सचिन सातव, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे युवक अध्यक्ष अविनाश बांदल, सेवादलाचे अध्यक्ष धीरज लालबिगे, राष्ट्रवादी काँग्रेस पुणे ग्रामीण निरीक्षक वनिता बनकर,युवती अध्यक्षा आरती गव्हाळे, सामाजिक न्याय विभाग जिल्हा उपाध्यक्ष साधू बल्लाळ, महिला शहर अध्यक्षा अनिता गायकवाड, मा.नगरसेवक संजय लालबिगे, आदित्य हिंगणे,ओबीसी सेलच्या बारामती शहर महिला अध्यक्ष द्वारकाताई कारंडे, कार्याध्यक्ष आशा आटपाटकर अविनाश चौधर, कुणाल झगडे इ मान्यवर उपस्थित होते.

अनंत आशा नगर मधील बायोगॅस प्रकल्पाची दुरुस्ती करून परिसरात पसरणारी दुर्गंधी कायमस्वरूपी बंद करणार असल्याचे प्रतिपादन बारामती सहकारी बँकेचे चेअरमन सचिन सातव यांनी केले. तर कचरा समस्यावर कायमस्वरूपी तोडगा काढून कचरमुक्त नगर करून दाखवू असे आश्वासन देखील नागरिकांना दिले.
आयोजित कार्यक्रमांमध्ये स्थानिक नागरिक व पदाधिकारी यांनी अनंत आशा नगर परिसरातील समस्यांची माहित देत संवाद साधला.

या प्रसंगी बाळासो जाधव, बाळासाहेब देवकाते, गोरख पारसे, मनोज केंगार,भारत देवकाते, विजय अहिवळे, ईश्वर पारसे, निवृत्ती गोरे,सचिन अहिवळे, अक्षय माने,गणेश गुळवे, उमेश कांबळे, आदींनी कार्यक्रमाचा पुढाकार घेत कार्यक्रम पार पाडला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here