


अंजनगाव येथे ३५ वर्षानंतर माजी विद्यार्थ्यांचा स्नेहमेळावा उत्साहात संपन्न
सोमेश्वर विद्यालय अंजनगाव ता. बारामती जि. पुणे येथे सन १९८९-९० च्या इयत्ता १० वी बॅचचा माजी विद्यार्थ्यांचा स्नेहमेळावा रविवार दि. २७ जुलै २०२५ रोजी उत्साहात व खेळीमेळीत पार पडला. यावेळी शाळेत स्वच्छता मोहिम राबवुन सर्वांनी वर्ग खोल्या व परिसर स्वच्छ केला. शाळेस ५० झाडे देणेचे ठरवुन वृक्षारोपन करणेत येणार आहे. भविष्यात दरवर्षी शाळेसाठी गरजेनुसार भेट देणेचे सर्वांनी ठरविले.
स्नेहमेळाव्यास उपस्थित माजी विद्यार्थ्यांचे व सरांचे चंद्रकांत चव्हाण, मोहन चव्हाण, रत्ना मोरे, राजश्री सव्वालाख यांनी गुलाब पुष्प देऊन स्वागत केले. आमंत्रित श्री. घाटगे सर, देवकाते सर, साळुंके सर उपस्थित राहिले व त्यांनी मार्गदर्शन करून स्नेहमेळाव्यास शुभेच्छा दिल्या. यावेळी जुन्या आठवणींना उजाळा दिला व विद्यार्थ्यां प्रमाणे वर्ग भरला आणि सर्वांनी शाळेतील आठवणीं सांगितल्या व सरांच्या उपस्थितीत शाळा भरल्या सारखी वाटली. जुन्या मित्रांच्या सोबतच्या आठवणी व भेट आणि गुरूजणांचे ऋण व्यक्त करण्यासाठी स्नेहमेळाव्याचे आयोजन केल्याचे सर्वांनी भावना व्यक्त केल्या. सदर स्नेहमेळावा भरविणेचे व मित्र मैत्रिणींच्या भेटी व्हाव्यात याचे नियोजन सर्वांनी एकमेकांना संपर्क करून मनापासुन प्रयत्न केले.
स्नेहमेळाव्यांचे प्रास्ताविक सुर्यकांत मोरे यांनी केले व त्यावेळी त्यांनी शाळेतील आठवणी व बालपणी विटु दांडु, गोट्या, सुर पारूंब्या, चोर- पोलीस, सुरपाट्या, उन्हाळी सुट्टी पोहणे, चक्र, सायकल, कागदी फिंगरी, पतंग, मुलींच्या जिबल्या, रिंगण, झोका,चिंचोके या खेळलेल्या खेळांचे आठवणींचे क्षण सांगितले व पुढील भावी आयुष्य निरोगी व आनंदी जावे अशा शुभेच्या दिल्या. ॲड. राजीव मोरे यांनी सुत्रसंचलन केले व शाळेतील आठवणींचे किस्से सांगुन मैत्रीचा असाच वारसा पुढे चालु ठेवा असे सांगुन सरांनी लावलेल्या कडक शिस्तीचा व संस्काराचा फायदा झाला. याबाबत सरांचे ऋण व्यक्त केले. स्नेहमेळाव्यांस मंदा धाडगे, शोभा गावडे, मनिषा कुचेकर, अलका चव्हाण, प्रभाकर परकाळे, राजु लावंड, बाळासाहेब घोरपडे, प्रल्हाद वायसे, संजय सस्ते, अनिल दळवी आणि सौदी अरेबिया येथील व्हिडीओ कॉन्फरन्स द्वारे आनंद परकाळे उपस्थित होते. लक्ष्मीकांत थोरात यांनी उपस्थित सर्वांचे आभार मानले व मित्र मैत्रिणी भावनिक होऊन समारोप घेतला.