
अंगणवाडी केंद्रावर रांगोळीच्या माध्यमातून मतदार जागृती
बारामती, ६ :बारामती मतदारसंघातील सोनवडी सुपे, बारवनगर, मोरगांव, सुपा, लोणीभापकर, विठ्ठलनगर, कऱ्हाटी, कुरणेवाडी, मुर्टी, बालगुडे पट्टा, बहाणपुर व नेपतवळण, जराडवाडी, वंजारवाडी, जैनकवाडी, डोर्लेवाडी येथील अंगणवाडी केंद्रावर अंगणवाडी महिला सेविकांनी रांगोळीच्या माध्यमातून मतदार जनजागृतीच्या रांगोळ्या काढून मतदार जनजागृतीपर संदेश दिला.

यावेळी ‘तुमचे मत तुमचा अधिका’ ‘ताई,माई, अक्का मतदानाला चला’ ‘मतदानाचा हक्क बजावूया’ ‘मतदान करा सहकार्य करा’ ‘मतदान राजा जागा हो लोकशाहीचा धागा हो’ ‘ सोडा सगळे काम… चला करूया मतदान’ १८ वर्षाचे वय केले पार… मतदानाचा घेऊ अधिकार’ असा मतदार जनजागृतीचा संदेश देणाऱ्या रांगोळ्या काढण्यात आल्या. या उपक्रमास महिलांचा उस्फुर्त प्रतिसाद लाभला.