१५ डिसेंबर रोजी बारामती पॉवर मॅरेथॉनचे आयोजन : रॉक बँड , स्पोर्ट्स एक्स्पो सह अनेक रंगारंग कार्यक्रमांची रेलचेल…

0
42

१५ डिसेंबर रोजी बारामती पॉवर मॅरेथॉनचे आयोजन : रॉक बँड , स्पोर्ट्स एक्स्पो सह अनेक रंगारंग कार्यक्रमांची रेलचेल

ता.१० बारामती (प्रतिनिधी) : पहिल्या सिझन मध्ये मिळालेल्या अभूतपूर्व प्रतिसादानंतर १५ डिसेंबर रोजी बारामती स्पोर्ट्स फाऊंडेशनच्या वतीने पुनीत बालन ग्रुप प्रस्तुत “बारामती पॉवर मॅरेथॉन सीजन २” चे आयोजन करण्यात आले आहे. या मॅरेथॉनला वर्ल्ड ऍथलेटिक असोसिएशनची मान्यता असून कॉम्रेड मॅरेथॉन सारख्या आंतरराष्ट्रीय ख्यातीच्या मॅरॅथॉनसाठी पात्रता निकष म्हणून बारामती पॉवर मॅरेथॉन ग्राह्य धरली जाणार आहे.

राज्याचे उपमुख्यमंत्री मा.ना.अजितदादा पवार, खासदार सौ. सुनेत्रावहिनी पवार, पुनीत बालन ग्रुप चे सर्वेसर्वा उद्योजक पुनीत बालन , सौ. जानवी पुनीत धारिवाल- बालन, आंतरराष्ट्रीय धावपट्टू ललिता बाबर , आयपीएस कृष्णप्रकाश (चीफ- फोर्स वन महाराष्ट्र) , अभिनेता जॅकी भगनानी आणि अन्य मान्यवरांच्या शुभहस्ते रेल्वे स्टेशन ग्राउंड , बारामती येथे दि.१५ डिसेंबर रोजी या मॅरेथॉनचे दिमाखदार उद्घाटन संपन्न होणार आहे.

तत्पूर्वी , बारामती आणि परिसरातील रनर्सचे बिब (रजिस्ट्रेशन नंबर) आणि टी-शर्ट वाटप शुक्रवार , दि. १३ डिसेंबर रोजी पार पडेल. तर , बारामती बाहेरून आलेल्या रनर्सचे बिब (रजिस्ट्रेशन नंबर) आणि टी-शर्ट वाटप शनिवार , दि. १४ डिसेंबर रोजी पार पडेल. बारामती मधील आरोग्यप्रेमी नागरिकांसाठी विविध आंतरराष्ट्रीय ब्रँडचे स्पोर्ट्स विषयक उत्पादनांचे स्टॉल्स (स्पोर्ट्स एक्स्पो) दि.१३ डिसेंबर आणि १४ डिसेंबर अश्या दोन्ही दिवशी रेल्वे स्टेशन ग्राउंड वर उभारण्यात येणार आहे.

दि.१४ डिसेंबर रोजी , मॅरेथॉनच्या पूर्वसंध्येला बारामतीकरांसाठी सायंकाळी ‘रॉक बँड’ चा खास शो आयोजित करण्यात आला असून , बारामती मधील हा पहिलाच रॉक बँड परफॉर्मन्स असणार आहे.

प्रत्यक्ष मॅरेथॉनच्या दिवशी दि. १५ डिसेंबर रोजी , ४२ km चा पहिला फ्लॅग ऑफ पहाटे ४:०० वाजता , २१ km चा फ्लॅग ऑफ सकाळी ६:०० वाजता , १० km चा फ्लॅग ऑफ सकाळी ०६:१५ वाजता तर , ०५ Km आणि ०३ km चा फ्लॅग ऑफ सकाळी ०७:१५ वाजता होणार आहे. प्रत्येक रनिंग कॅटेगरीचे रिपोर्टिंग टायमिंग फ्लॅग ऑफ टायमिंगच्या ४५ मिनिटे आधी असणार आहे. प्रत्येक कॅटेगरीच्या फ्लॅग ऑफ पूर्वी झुंबा,म्युजिक व वॉर्मअप सेशन्सस् असणार आहे. धावण्याच्या संपूर्ण रूटवर सर्व रनर्ससाठी ऊर्जादायी खानपान-पेये उपलब्ध करून देण्यात येणार आहे. मॅरेथॉन ट्रॅकवर पारंपरिक वाद्यांनी रनर्सचा उत्साह वाढविला जाणार आहे. त्याचप्रमाणे रनर्ससाठी आपत्कालीन स्थितीत मॅरेथॉन दरम्यान हायड्रेशन पॉईंट आणि वैद्यकीय मदत पुरविण्यात येणार आहे. गतवर्षी पहिल्या सीजन मध्ये जगातील ०७ आश्चर्यांची थीम ठेवण्यात आल्यानंतर यंदाच्या सिझनमध्ये ‘प्राचीन ते आधुनिक भारत’ ही थीम ठेवण्यात आली असून सहभागी स्पर्धकांना धावण्याबरोबरच फोटोशूट साठी अविस्मरणीय अनुभव मिळणार आहे. तसेच , बारामती तालुक्याच्या जैवविविधतेची ओळख असणारा चिंकारा हरीण यंदाच्या मॅरेथॉनचा मस्कॉट (शुभंकर) आहे.

मॅरेथॉनचा बक्षीस वितरण समारंभ राज्याचे उपमुख्यमंत्री मा.ना.अजितदादा पवार आणि अन्य उपस्थित मान्यवरांच्या शुभहस्ते सकाळी ०८:०० वाजता संपन्न होणार आहे. अशी माहिती आयोजक बारामती स्पोर्ट्स फाऊंडेशनचे संस्थापक -अध्यक्ष, ट्रिपल आयर्नमॅन सतीश ननवरे आणि सर्व विश्वस्त आणि सदस्य यांनी दिली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here