हुतात्मा कोतवाल व हुतात्मा हिराजी पाटील यांचा क्रांतीज्योत कार्यक्रम
कर्जत:- हुतात्मा कोतवाल आणि हुतात्मा हिराजी पाटील स्मृती समितीतर्फे गुरुवार दिनांक 2 जानेवारी 2025 रोजी टिळक चौक कर्जत येथे पहाटे ६ वाजून १० मिनिटांनी शहिदांना वंदन करून विशाल मिरवणुकीचे आयोजन करण्यात आले असून रायगड भूषण, आदिवासी सेवक, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर समाज भूषण, प्रा. डॉ. जयपाल पाटील यांच्या शुभहस्ते क्रांतीज्योतचे प्रज्वलन करण्यात येणार आहे.यावेळी डॉ. रवींद्र मर्दानी शास्त्रज्ञ, श्री. मधुकर घारे, सामाजिक कार्यकर्ते, श्री. विद्यानंद ओव्हाळ इलेक्ट्रिक मीडिया पत्रकार, श्री. विजय मांडे ज्येष्ठ पत्रकार, श्री रमेश डगले श्री. कृष्णा पवार यांच्या शुभहस्ते भाई कोतवाल प्रतिमा पूजन व पुष्प माला अर्पण करण्यात येणार असून, हुतात्मा हिराजी पाटील प्रतिमा पूजन व पुष्प माला अर्पण श्री. राजेश लाड माजी नगराध्यक्ष, श्री. मनोहर शेठ थोरवे माजी उपसभापती, श्री. दीपक पवार,श्री. विशाल कोकरे यांच्या हस्ते होणार आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांना पुष्प माला श्री. हरिश्चंद्र यादव, श्री. गणेश गायकवाड, श्री. उमेश राऊत, श्री. बंडू पवार यांच्या हस्ते होणार आहे. सिद्धगड मूर्तिका पूजन श्री. मोहन शेठ ओसवाल, श्री. वसंत शेठ भोईर, श्री. नारायण गायकवाड, श्री. शरद पवार, श्री.शशिकांत मंडलिक, श्री. वसंत कोकरे,सामाजिक कार्यकर्ते यांच्या हस्ते होणार आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस पुष्पमाला, श्री. राहुल डाळिंबकर, श्री. सुनील आढाव, श्री. विनायक गायकवाड यांच्या हस्ते होणार आहे. सिद्धगड इथून मूर्तिका आणण्यासाठी एडवोकेट गोपाळ शेळके, एडवोकेट संतोष जोहेकर डॉ. जयपाल पाटील श्री. निवृत्ती ढाकवळ, श्री. विकास रणपिसे, श्री. अविनाश कोलटकर, श्री. घनश्याम दगले घेऊन येणार आहेत. सकाळी ६ वाजून १० वाजता पूर्वांपारिक पद्धतीने मशाल पेटवून कर्जत शहरात फिरवण्यात येईल. आयोजक सामाजिक संस्था सन 1990 सालापासून रायगड करांना अभिमान असणाऱ्या या शहिदांना मानवंदना देण्याचा कार्यक्रम आयोजित करते याचे संयोजन एडवोकेट गोपाळ शेळके एडवोकेट सौ. योगिनी लोखंडे, श्री. सुधीर कांबळे, श्री. प्रभाकर आसवले, श्री.अरुण थोरवे व अडवोकेट संतोष जोहेकर करतात.