सवाई गंधर्व संगीत महोत्सवासाठी २१ डिसेंबर रोजी रात्री बारा वाजेपर्यंत ध्वनीक्षेपक वापरास परवानगी

0
19

सवाई गंधर्व संगीत महोत्सवासाठी २१ डिसेंबर रोजी रात्री बारा वाजेपर्यंत ध्वनीक्षेपक वापरास परवानगी

पुणे, दि. १३ : पुणे शहरात १८ ते २२ डिसेंबर या कालावधीत आयोजित ७० व्या सवाई गंधर्व भीमसेन महोत्सवासाठी २१ डिसेंबर २०२४ रोजी सकाळी ६ वाजल्यापासून ते रात्री १२ वाजेपर्यंत ध्वनीक्षेपक व ध्वनीवर्धक यंत्रणेचा वापर करण्यास जिल्हाधिकारी डॉ. सुहास दिवसे यांच्या आदेशानुसार परवानगी देण्यात आली आहे.

पुणे जिल्ह्यासाठी ध्वनीक्षेपक व ध्वनीवर्धक वापरासाठी सवलतीचे १५ दिवस निश्चित करण्यात आले आहेत. त्यापैकी १३ दिवस यापूर्वीच सवलत देण्यात आली असून शिल्लक राहिलेल्या २ दिवसातून १ दिवस आर्य संगीत प्रसारक मंडळाच्या विनंतीवरून २१ डिसेंबर रोजी ध्वनीक्षेपक व ध्वनीवर्धक यंत्रणेचा वापर करण्यास परवानगी देण्यात येत आहे.

ध्वनी प्रदुषण नियम २००० आणि ध्वनी प्रदूषण (नियमन व नियंत्रण) सुधारित नियम २०१७ मधील तरतुदींचे पालन करण्यात यावे. ध्वनीची विहित मर्यादा राखून ध्वनीक्षेपक व ध्वनीवर्धक यंत्रणेचा वापर करावा. ध्वनीचे शोषण करणारे विशिष्ट लाकडी सामुग्री आवश्यक त्या ठिकाणी लावावी. क्षेत्राप्रमाणे (झोनींग) ठरलेल्या मर्यादेपेक्षा जास्त आवाज ठेऊ नये तसेच शांतता क्षेत्रात ही सूट लागू नसल्याचे आदेशात स्पष्ट करण्यात आले आहे.
0000

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here