HomeUncategorizedदैनिक देशोन्नती मध्ये दर मंगळवारी प्रकाशित माझा साप्ताहिक स्तंभ सरळ सरळ समृध्दी...

दैनिक देशोन्नती मध्ये दर मंगळवारी प्रकाशित माझा साप्ताहिक स्तंभ सरळ सरळ समृध्दी महामार्गावर अपघात : चर्चा

दैनिक देशोन्नती मध्ये दर मंगळवारी प्रकाशित माझा साप्ताहिक स्तंभ सरळ सरळ समृध्दी महामार्गावर अपघात : चर्चा

थोडा सब्र कर लो,
जिंदगी बहुत बडी है,
इतना तेज चलोगे तो,
आगे दुर्घटना खडी है।

परवा बुलढाणा जिल्ह्यात झालेल्या ट्रॅव्हल्स बसच्या अपघातात २५ मृत्यूने देश हळहळला. सदर समृध्दी महामार्गावर गेल्या ६ महिन्यात एक हजार एकशे पंच्चावन अपघात झाले. यामध्ये वाहनांचे ब्रेक फेल झाल्याने ४००, टायर पंचर होवून ४०, गाडीचे टायर फुटून १०८ तर ओव्हरस्पीडमुळे १०० अशी या अपघातांची कारणे सांगण्यात आली तर ६ महिन्यात एकूण ३०० मृत्यू म्हणजेच दररोज सुमारे दोन मृत्यूची आकडेवारी सांगून गंभीरतेकडे लक्ष वेधले आहे.

अपघात झाल्यावर त्याची चर्चा होणारच. अपघाताला दोषी व्यक्ती कोण? सदोष रस्ता कसा? वाहनातील बिघाड व दोष यासोबतच रस्ता बनविणारे सरकार व उद्घाटन करणारे नेते हेच खूनी कशे? आणि यापेक्षाही हाईट म्हणजे चालक मुस्लीम आणि मरणारे हिंदू असे अपघात किती व ते कसे ठरवून केले जातात, चालकच कसे बचावतात? यावरही चर्चा व आरोप म्हणजे कळसच म्हणावे लागेल. रस्ते सदोष असतातच हे आपल्याकडे नविन नाही तर हे माहिती असतांना स्व-नियंत्रणाचे काय? यावर मात्र कोणी बोलत नाही.

सर्वप्रथम चालकाचाच विषय घेतला तर चालक निर्मितीची प्रक्रिया आपल्याकडे किती सुलभ आहे, कसा परवाना मिळतो, त्यासाठीचे एजंट/दलाल किती महत्त्वपूर्ण भूमिका बजावतात, चालकाची शाळा, त्याची परीक्षा व दर्जा ह्या बाबी आणि लायसनन्स मिळविण्याची सोपी प्रक्रिया यावरुन चालक किती निष्णांत घडतात याची कल्पना येते. विदेशात ही प्रक्रिया कठीण परीक्षेतून जाते, तेव्हा सुरक्षितता आणि जागरुकताचे महत्त्व अधोरेखीत होते. तर कुशल चालकाचे नेतृत्व वाहनाच्या सुरक्षितता अबाधीत करते.

स्व-नियंत्रण हे सर्वात मोठे नियंत्रण प्रत्येक बाबतीत मानल्या जाते. रस्ते कितीही छान, निर्मनुष्य व लांब असो, आपण किती वेगाने व कसे चाललो पाहिजे, कोणत्याही स्थितीत वाहनावर नियंत्रण कसे मिळविता येईल, आदीचा विचार म्हणजेच स्व-नियंत्रण होय. ज्या गोष्टी आपल्या हातात आहेत, त्यावर नियंत्रण मिळविता येणे, यालाच स्व-नियंत्रण म्हणतांना अतीफाजीलपणा करणे, स्वत:सह इतरांचा जीव संकटात टाकणे, ही प्रवृत्ती चुकीची ठरते आणि दोष मात्र नेहमी दुसर्‍यांना व इतर कारणांना देण्याचे कार्य पार पाडले जाते.
समृध्दी महामार्ग शाप आहे, रस्ताच बरोबर नाही, असे म्हणणे योग्य वाटत नाही. रस्ता हा रस्ताच आहे, तो निर्जीव आहे, हालचाल करीत नाही, जागेवरुन सरकत नाही. जसा ‘चाकू’ तसा ‘रस्ता’ आहे. चाकुचा वापर चांगली फळे, भाज्या कापण्यासाठी किंवा खून करण्यासाठी करता येतो, तसेच रस्त्याचा वापर इच्छितस्थळी पोहचण्यासाठी किंवा मृत्यूच्या दारात जाण्यासाठी करता येतो, असे म्हटल्यास वावगे ठरु नये. सुविधा आहेत. वापर मात्र सांभाळून व्हावयास हवा.

प्रत्येक रस्त्यावर कमी जास्त प्रमाणात पुलांचे बांधकाम असते. रस्ते व पूल जोडणीच्या ठिकाणी लेव्हल व्यवस्थित नसणे, परिणामी गतीशील वाहन उसळणे, बॅलेन्स बिघडणे असे प्रकार हमखास घडतात. यामुळे अपघाताचे बरेच प्रमाण आहेत मात्र याकडे संबंधित विभागाचे दूर्लक्ष असते. तेव्हा रस्त्याचे वेळोवेळी निरिक्षण व अत्यावश्यक सुधारणा पण तातडीने करत राहणे खूप गरजेच्या ठरतात.

रस्त्यांचा विकास हा क्रमप्राप्त आहे. वेळ वाचविणे, अडथळे संपवून राष्ट्रीय संपत्ती म्हणून डिझेल, पेट्रोल वाचविणे आदी उद्देश चुकीचे म्हणता येणार नाही. मात्र त्यापेक्षाही जीव वचविणे हे खूप महत्त्वाचे आहे. तेव्हा जीव वाचविण्यासाठीच्या उपाययोजना केल्याच पाहिजेत. सोबतच प्रत्येक घटक जबाबदार झाला पाहिजे.
रस्त्यावर धावणार्‍या प्रत्येक वाहनाच्या चालकाने वेगावर नियंत्रण वेळीच मिळविता येईल. त्याच वेगात वाहन चालविले पाहिजे. पुढच्या वाहनाला ओव्हरटेक करतांना अतिआत्मविश्वास नसावा अशा प्रकारच्या प्राथमिक दक्षता बाळगून वाहन चालविले तर अपघात टाळण्यास बरीच मदत होवू शकते. मात्र अशा बाबीकडे सुध्दा अनेक चालकांकडून दुर्लक्ष केल्या जाते.
रात्रीच्या धावणार्‍या बसेसमध्ये अतिरिक्त चालक असावा, निर्मनुष्य रस्त्यावरील टायरचा व इंजिनच्या आवाजाने निर्माण होणारी लयबध्दतामुळे झोप (डुलकी) लागणार नाही, यासाठी उपाय असावेत.

शेवटी अपघात बेसावधपणामुळे होत असतात मात्र त्यापासून बोध घेऊन वेळोवेळी सावध होत राहणे गरजेचे असते, या अशयाच्या ओळी आठवतात…
जोश में नही होश मे गाडी चलाओ,
जिंदगी यूँ ही नही मिलती,
खतरों से सदा रहो सावधान
दुघर्टना यूँ ही नही घडती…

दैनिक देशोन्नती मध्ये दर मंगळवारी प्रकाशित माझा साप्ताहिक स्तंभ सरळ सरळ समृध्दी महामार्गावर अपघात : चर्चा
              -- राजेश राजोरे
RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

Recent Comments

मदन ( बापू) कोल्हे जेष्ठ पत्रकार संपादक धर्मभूमी परभणी on