समृद्धी महामार्गावर झालेल्या अपघातापासून सरकारने व प्रशासनाने यावर काय ठोस पावले उचलले ?

0
192

समृद्धी महामार्गावर झालेल्या अपघातापासून सरकारने व प्रशासनाने यावर काय ठोस पावले उचलले…! बुलढाणा जिल्ह्यातील सिंदखेडराजा जवळ समृध्दी महामार्गावर खासगी लक्झरी बस अपघातात 25 जणांचा होरपळून मृत्यू झाल्याची घटना अतिशय दुर्दैवी आणि दुःखदायक आहे. या अपघातात मृत्यू पावलेल्या प्रवाशांना भावपूर्ण श्रद्धांजली !!समृद्धी महामार्गावर झालेल्या अपघातापासून सरकारने व प्रशासनाने यावर काय ठोस पावले उचलले…! काल रात्री झालेल्या दुर्दैवी त्या २६ लोकांचा बस अपघातात होरफळून मृत्यू समृद्धी महामार्गावर झाला . समृद्धी महामार्ग झाला हे बरे आहे . परंतु त्यावर असे अपघात होत राहीले किंवा होणे हे मात्र दुर्दैव..!

सरकारने यावर त्वरित पुन्हा असे अपघात होऊ नये करिता निर्णय घ्यावा व प्रशासनाने यावर काटेकोर रस्ता नियमन पालनचे कर्तव्य दक्ष वाहन चालक आहेत का यावर लक्ष केंद्रित करावे कार्यतत्पर व कर्तव्यदक्ष वाहन चालक नसेल तर त्यावर त्वरित कारवाही ही झालीच पाहिजे अशी जनतेतून काल झालेल्या अपघातामुळे चर्चा होत आहे..! या समृद्धी महामार्गावरून राजकारण नकोय तर उपाययोजनाची आवश्यकता असल्याचे जनतेतूनही बोलले जात आहे. रस्ते मोठे हवेत तर अपघात टाळावयाचे नियमन हे मोठ्या प्रमाणात काटेकोरपणे झालेच पाहिजे यावरही यंत्रणा उभारणे गरजेचे .. आहे..!

या झालेल्या कालच्या अपघातामुळे अनेकाचे जीवघेणारी घटना घडली हे मात्र दुर्दैव आहे.तरी सरकारने व प्रशासनाने यावर आता तरी कठोर रस्ता नियमन विषयी कायमचा तोडगा काढण्याचा निर्णय व्हावा. सरकारने व प्रशासनाने समृद्धी महामार्गासारखे मार्ग करतानी हा विचार नाही केला की या मोठ्या मोठ्या लांबच्या टप्प्यावर बस थांबे , हॉटेल्स कॅन्टीन उभारणे आवश्यक होते. मात्र काही महामार्गावर दूर दूरवर ढाबे हॉटेल्स कॅन्टीन नसल्याकारणाने रात्री अपरात्रीच्या वेळी अनेक प्रवाशांना व वाहन चालकांना गैरसोय होताना आढळून येत आहेत.

तर ही वस्तुस्थिती आहे त्यामुळे लांब पल्ल्याच्या गाड्या विसावा घेत नाहीत तर ड्रायव्हरला धुंदी आल्याशिवाय राहत नाही याकरिता इथून पुढे तरी कॅन्टीनस ढाबे उभारणे आवश्यक आहे लांबच्या पल्याकरिता मराठवाडा विदर्भ जाणाऱ्या या रस्त्यांना व अन्य विभागातील रस्त्यांनाही वरील कारणामुळे अपघात होत असल्याचे अनेक प्रवाशांच्या निदर्शनातून व नागरिकांतून चर्चिले जात आहे. तरी असे विविध अपघात पुढे भविष्यात कधीही कुठल्याही महामार्गावर घडू नयेत करिता रस्ता नियमन कठोर वाहन चालकांना शिस्त करण्याच्या करिता सरकारने व प्रशासनाने पावले उचलावेत पुढील अनर्थ टाळावे हे काळाची गरज आहे. समृद्धी महामार्गावर मृत्युमुखी पडलेल्या त्या मृतात्म्यांना शांती लाभो भावनगरीच्या वतीने भावपूर्ण श्रद्धांजली

Previous articleआठवणीतला पाऊस
Next articleअजित पवार.. चं.. भावी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री काय….!
Bhavnagari
मी संपादक श्री.संतोष नारायण शिंदे बारामती इंदापूर भिगवन फलटण सातारा सांगली सह संपूर्ण महाराष्ट्र व विविध राज्यातून भारत देशातून दिल्ली मुंबई नागपूर गोवा विदर्भ पश्चिम महाराष्ट्र खानदेश उत्तर प्रदेश बंगाल विविध राज्यातून भावनगरी या वेबपेजच्या माध्यमातून सामाजिक, सार्वजनिक, सांस्कृतिक, क्रीडा, आरोग्यदायी, शेती, विविध विषयक जनहितार्थ वेब पेज पोर्टल वरती लोकहितार्थ बातमी, लेख जनोपयोगी प्रकारचे कथा-कथन कविता, सांस्कृतिक, क्रीडा विविध विषयावरती लेखन या भावनगरी वेब पेजच्या माध्यमातून जनहितार्थ प्रकाशित करत आहे...

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here