संपादक व पत्रकार सेवा संघाची राज्य कार्यकारिणी जाहीर…!

संपादक व पत्रकार सेवा संघाची राज्य कार्यकारिणी जाहीर

0
121

संपादक व पत्रकार सेवा संघाची राज्य कार्यकारिणी जाहीर

(प्रतिनिधी)
संगमनेर – राज्यातील ग्रामीण भागातील संपादक, पत्रकारांच्या न्याय हक्कासाठी लढणार्‍या संपादक व पत्रकार सेवा संघ महाराष्ट्र, मुंबई या संघटनेची महत्त्वाची बैठक नुकतीच दृष्य प्रणालीद्वारे पार पडली. संघटनेचे संस्थापक अध्यक्ष किसन भाऊ हासे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या या बैठकीत संस्थेची राज्य कार्यकारिणी जाहीर

करण्यात आली.
संपादक व पत्रकार संघ महाराष्ट्र मुंबई ही संघटना संपादक व पत्रकारांच्या प्रश्नांसाठी शासनदरबारी सातत्याने आवाज उठवत आहे. शासकीय जाहिरात धोरण, पत्रकार मानधन, आरोग्याबाबत सरकार करीत असलेल्या दुर्लक्षामुळे पत्रकारांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागत आहे. या प्रश्नांवर संस्थेच्यावतीने केलेल्या पाठपुराव्यामुळे आ. सत्यजीत तांबे यांनी विधानपरिषदेत पत्रकारांच्या प्रश्नांसंदर्भात औचित्याचा मुद्दा मांडला. याप्रसंगी अध्यक्ष किसन भाऊ हासे यांनी उपस्थित संपादकांना आवाहन केले की, आपण संघटीत राहिलो तरच आपला आवाज मंत्रालयात घुमेल. संपादकांनी संघटीत लढा दिला तरच आपले प्रश्न मार्गी लागतील.
या दृष्य प्रणालीद्वारे पार पडलेल्या बैठकीत राज्य कार्यकारिणी जाहीर करण्यात आली. संस्थेच्या अध्यक्षपदी किसन भाऊ हासे, उपाध्यक्ष नरेंद्र मधुकर लचके, राज्य समन्वयक मनोज शंकरराव आगे, प्र. सचिव अरविंद गाडेकर, सहसचिव सुदीप किसन हासे, राज्य समिती सदस्यांमध्ये डॉ. नामदेव शिवराम गुंजाळ, राजाभाऊ कांदळकर, पराग अरूण कुलकर्णी (मुंबई), दिपक दळवी (ठाणे), विलास कट्यारे, डॉ. हेमंत जोशी (पालघर), पंकज राऊत (पालघर), जयपाल पाटिल (रायगड), विजय दामोधर कडू (रायगड), धनश्री पालांडे (रत्नागिरी), नंदकिशोर महाजन (सिंधुदुर्ग), सीमा मराठे (सिंधुदुर्ग), सय्यद निसार हाजी मुकबुलभाई (अहमदनगर), जयंत देशपांडे (अहमदनगर), वसंत सोनार (नंदुरबार) यांच्यासह राज्यातील इतर जिल्ह्यातील संपादकांची राज्य कार्यकारणीत निवड करण्यात आलेली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here