शारदानगर मध्ये संपन्न झाला कारगिल रजत महोत्सव……”

0
196

शारदानगर मध्ये संपन्न झाला कारगिल रजत महोत्सव……”

शारदानगर (बारामती); ॲग्रीकल्चरल डेव्हलपमेंट ट्रस्ट व लक्ष्य फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने दि. 4 व 5 ऑक्टोबर बुधवार रोजी कारगिल विजय रजत महोत्सव संपन्न झाला. ॲग्रीकल्चरल डेव्हलपमेंट ट्रस्ट,शारदानगर बारामती ही संस्था नेहमीच कृषी,आरोग्य,सामाजिक,शैक्षणिक अशा अनेक क्षेत्रात महत्वपूर्ण कार्य करत असते.यावेळीही उत्तम भारतीय नागरिक घडवण्यासाठी जीवनातील आपल्या कर्तृत्वाने आदर्श असणारे भारतीय सैनिक जर शालेय जीवनात विद्यार्थ्यांसमोर आले तर वास्तव परिस्थितीचे भान राहून हाच विद्यार्थी भविष्यातील आदर्श नागरिक होईल आणि या कार्यक्रमातून प्रेरणा घेवून भारतीय सैन्यदल व त्यामधील सेवा याचाही आदर्श समोर ठेऊन अनेक विद्यार्थी सैन्य दलामध्ये भरतीची प्रेरणा निर्माण करणे या उद्देशाने शारदानगर याठिकाणी या कार्यक्रमाने आयोजन करण्याचा प्रयत्न संस्थेच्या विश्वस्त सौ.सुनंदाताई पवार यांनी केला.
याबाबत सविस्तर माहिती अशी की, 1999 साली कारगिल या ठिकाणी भारत-पाकिस्तान युद्ध झाले. यामध्ये भारताचे अनेक जवान शहीद झाले, परंतु या सर्व परिस्थितीवर मात करत भारताने अखेर कारगिल युद्ध जिंकले या घटनेस 2024 सालामध्ये 25 वर्ष पूर्ण होत आहेत म्हणून लक्ष्य फाउंडेशन पुणे अंतर्गत अनुराधा प्रभुदेसाई व त्यांची संपूर्ण टीम महाराष्ट्रामध्ये कारगिल विजय रजत महोत्सव साजरा करत आहेत. या रजत महोत्सवाच्या माध्यमातून भारतीय सैन्य दल व नागरिक यांच्यातील दरी सांधणे,देशासाठी बलिदान केलेल्या भारतीय जवानांची शौर्यगाथा विद्यार्थ्यांसमोर ठेवून त्यांच्यामध्ये नवचैतन्य निर्माण करणे आणि विद्यार्थी दशेमध्येच उत्तम नागरिक बनण्यासाठी आणि देशाविषयी प्रेम निर्माण करण्यासाठी प्रेरणा निर्माण करणे, त्याचबरोबर समाज, सैनिक आणि सैनिकाचे कुटुंब यामध्ये एक भावनिक बंध निर्माण करणे आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे भारतीय जवानांच्या कर्तृत्वासाठी कृतज्ञता व्यक्त करण्याची संधी या माध्यमातून एक भारतीय नागरिक म्हणून निर्माण करणे या उद्देशाने या कार्यक्रमाचे आयोजन ठिकठिकाणी केले जात आहे.


शालेय जीवनातच विद्यार्थ्यांना राष्ट्रभक्ती देशप्रेम या नैतिक मूल्यांची रुजवणूक करणे गरजेचे आहे. म्हणूनच कारगिल युद्धातील प्रत्यक्ष लढवय्ये जवान यामध्ये कारगिल युद्धातील 18 ग्रेनेडियर्स मधील वीरचक्र प्राप्त कर्नल सचिन निंबाळकर तसेच याच ग्रेनेडियर्समधील महावीरचक्र प्राप्त कर्नल बलवान सिंग यांनी शारदानगर मधील विविध विभागातील व परिसरातील विद्याप्रतिष्ठान इंग्लिश मिडीयम स्कूल,विद्याप्रतिष्ठान पिंपळी, विद्याप्रतिष्ठान बालविकास, विद्याप्रतिष्ठान सायरस पूनावाला,शारदाबाई पवार शिवनगर माळेगाव,इ अनेक शाळांमधील इयत्ता 5 वी पासून पदवीपर्यंतच्या साधारण दहा हजार विद्यार्थ्यांशी संवाद साधला. यावेळी कर्नल सचिन निंबाळकर सर म्हणाले;’हा केवळ माझ्या एकट्याचा सन्मान नसून संपूर्ण जवानांचा सन्मान आहे’. कर्नल बलवान सिंग म्हणाले; ‘सैनिकांची वर्दी हाच त्यांचा धर्म आहे आणि देशाचे संरक्षण हे सर्वश्रेष्ठ आहे’ .
अनुराधाताई यांनी विद्यार्थ्यांच्या मनातील प्रेरणा जागृत करून कार्यक्रमाची सुरुवात केली व या भारतीय जवानांची मुलाखतीच्या माध्यमातून संवाद साधत यावेळी कारगिल मधील युद्धजन्य परिस्थितीतील अनुभव उलगडत प्रेरणा निर्माण केली.सकारात्मक गोष्टी या कार्यक्रमातून विद्यार्थ्यांनी घेऊन जाणे गरजेचे आहे . “मेरा देश मेरी पेहचान” ही घोषणा यावेळी सर्वांच्या मनामध्ये ऊर्जा निर्माण करणारे ठरली. त्याचबरोबर शालेय विद्यार्थ्यांनी भारत माता की जय, सर्वदा शक्तिशाली, प्रभू रामचंद्र की जय, जय महाकाली आयो गोरखाली इ अनेक अशा घोषणा दिल्या.
कार्यक्रमानंतर प्रमुख पाहुणे शारदानगर मधील एनसीसी विद्यार्थ्यांची मानवंदना घेत व योगा, मल्लखांब व विद्यार्थ्यांच्या घोषणा आणि एनसीसी विद्यार्थ्यांच्या समवेत शारदा स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स या ठिकाणी आले.तेथे कारगिल रजत महोत्सव यानिमित्ताने घेण्यात आलेल्या विविध स्पर्धांचे बक्षीस वितरण करण्यात आले. ॲप्सस्टिकल्स रेस याचा डेमोही घेण्यात आला व यातील अठरा वर्षावरील मुले यामध्ये दीप जगताप, प्रसाद पांचाळ, आदित्य चव्हाण तर अठरा वर्षावरील मुली प्रणाली काशीद,आकांक्षा गाढवे, करिष्मा साळुंखे. अठरा वर्षाखालील मुले आदित्य कदम,शंभूराजे झोळ, शुभम भोसले.अठरा वर्षाखालील मुली सिद्धी भोसले,प्राची अंधारे व वैष्णवी ढोले. यांना अनुक्रमे प्रथम द्वितीय व तृतीय क्रमांकाचे बक्षीस देण्यात आले.
त्यानंतर ‘भारतीय सैन्य दल माझा अभिमान’ या विषयावर आधारित साधारण एक हजार पेक्षा जास्त विद्यार्थ्यांनी बनवलेल्या पोस्टर प्रेसेंटेशन स्पर्धेमधून शारदाबाई पवार विद्यालय,शिवनगर या शाळेतील इयत्ता दहावी मधील गायत्री भोसले, श्रुती परकाळे, शिवाजी तावरे, रसिका देवकाते, दिशा सोरटे यांना प्रथम क्रमांकाचे तर विद्या प्रतिष्ठान इंग्लिश मीडियम स्कूल बारामती यामधील आर्या वेल्हाळ हिस द्वितीय क्रमांकाचे आणि शारदाबाई पवार विद्यानिकेतन शारदानगर मधील सिद्धी लडकत या विद्यार्थिनींना तृतीय क्रमांकाचे बक्षीस प्राप्त झाले.


त्याचबरोबर जलतरण स्पर्धा ही घेण्यात आलेल्या होत्या यामध्ये विविध वयोगटामध्ये विद्या प्रतिष्ठान येथील अकरावी सायन्सचा विद्यार्थी श्रीशकुमार शिंदे याने ५० मी. व १००मी.पहिला आला.यासह मानव तावरे, श्रेया साळुंखे, अमन जाधव, संस्कृती रसाळे, वीरेंद्र पवार, अरुंधती सोनवणे, स्वरांजली तावरे, वरदा कुलकर्णी, ओम साळुंखे, जय बागल,आरुष शिंदे, यांनी विविध वयोगटात प्रथम क्रमांक तर सिद्धार्थ कदम, स्वप्नप्रीती कोठावळे, सुमेध चौरे, शौर्य निंबाळकर, गौरव तनपुरे, श्रेणिक पाटील,आयुष निमकर, ज्ञानेश्वरी पाटील,दीपक दळवी, धनश्री मुंढे, जुनेद शेख, प्राजक्ता कापसे,कैलास घोडेकर, वेदांतिका चव्हाण यांनी विविध वयोगटात द्वितीय व तृतीय क्रमांक प्राप्त केले. या सर्व यशस्वी

विद्यार्थ्यांचे कर्नल सचिन निंबाळकर व कर्नल बलवान सिंग यांच्या हस्ते सन्मानपत्र,ट्रॉफी व रोख रक्कम देऊन सन्मान करण्यात आला.
यावेळी उपस्थित सर्व खेळाडूंना ‘खेळामध्ये कष्ट करा, सातत्य ठेवा, अपयशातून शिका आणि यशापर्यंत पोहोचा तसेच मन शांत राहिलं तर अभ्यास चांगला होईल यासाठी खेळ खूप महत्त्वाचा आहे.’ असे आपल्या मार्गदर्शनातून कर्नल सचिन निंबाळकर व कर्नल बलवान सिंग यांनी प्रेरणा दिली.
या कार्यक्रमासाठी ॲग्रीकल्चरल डेव्हलपमेंट ट्रस्ट संस्थेचे चेअरमन मा. राजेंद्र दादा पवार,विश्वस्त मा.सुनंदाताई पवार, मा. नलवडे सर,समन्वयक मा.तनपुरे सर संस्थेच्या एच.आर मा.गार्गी दत्ता यांनी शुभेच्छा दिल्या. या कार्यक्रमासाठी संस्थेचे विश्वस्त डॉ.बारवकर ,देशपांडे सर व मा.साविताताई व्होरा उपस्थित होत्या.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here