विद्या प्रतिष्ठान, अभियांत्रिकी महाविद्यालयाचे डिजिटल मॅन्युफॅक्चरिंग आणि रोबोटिक ऑटोमेशन सेंटर ऑफ एक्सलन्स (COE) उद्घघाटन…

विद्या प्रतिष्ठान, अभियांत्रिकी महाविद्यालयाचे डिजिटल मॅन्युफॅक्चरिंग आणि रोबोटिक ऑटोमेशन सेंटर ऑफ एक्सलन्स (COE) उद्घघाटन...

0
124

विद्या प्रतिष्ठान, बारामतीने त्यांच्या अभियांत्रिकी महाविद्यालयात एक्सलन्सचे उ‌द्घाटन संपन्न..

(प्रतिनिधी) विद्या प्रतिष्ठान, बारामतीने त्यांच्या अभियांत्रिकी महाविद्यालयात एक्सलन्सचे उ‌द्घाटन (VPKBIET)

डिजिटल मॅन्युफॅक्चरिंग आणि रोबोटिक ऑटोमेशन हे सेंटर ऑफ एक्सलन्स (COE) स्थापन केले आहे. या सेंटर ऑफ

एक्सलन्सचे उ‌द्घाटन शरदचंद्रजी पवार (सदस्य, राज्यसभा) आणि दिपक छाब्रिया, अध्यक्ष,

फिनोलेक्स जे-पॉवर सिस्टीम्स लि. यांच्या शुभहस्ते झाले. या केंद्राची स्थापना शरदचंद्रजी पवार प्रतापराव पवार साहेब व विद्या प्रतिष्ठान संस्थेचे सर्व विश्वस्त यांच्या दूरदृष्टीतुन झाले असून देशातील उत्पादन क्षेत्रातील अभूतपूर्व वाढ पाहता त्यामधील वाढत्या गरजा पूर्ण करणे हे या केंद्राचे प्रमुख उद्दिष्ट आहे.

सुमारे ४००० चौरस फुटांवर पसरलेल्या या सेंटरमध्ये जागतिक दर्जाची सेवा-सुविधा व अत्याधुनिक तंत्रज्ञान यांचा मिलाप पाहायला मिळतो. ज्यात इंडस्ट्री 4.0 सक्षम उत्पादन सेटअप, इंटरनेट ऑफ थिंग्ज, AI-सक्षम औद्योगिक रोबोटिक्स असेंब्ली, आय आय ओ टी आणि एच एम आय आधारित स्कारा रोबोट, आय आय ओटी सेन्सर्स, पी एल सी ऑटोमेशन, 3D प्रिंटिंग लॅब, प्रगत सी एन सी तसेच मल्टी अॅक्सिस व्ही एम सी आणि डिजिटल द्विन तंत्रज्ञान, विविध अत्याधुनिक सिम्युलेशन सॉफ्टवेअर्ससह सिम्युलेशन लॅब, नाविन्यपूर्ण शिक्षणासाठी व प्रात्यक्षिकांसाठी उपलब्ध आहेत.

या सेंटर ऑफ एक्सलन्सची उद्दिष्टे खालीलप्रमाणे आहेत.

  • विद्यार्थी आणि उद्योग व्यावसायिकांना उद्योग 4.0 संबंधित ज्ञान आणि कौशल्ये प्रदान करणे
  • उद्योगाशी सहयोग करणे
  • नाविन्यपूर्ण उत्पादन डिझाइन हाती घेणे
  • विद्यार्थ्यांना R&D आणि उद्योजकतेसाठी प्रोत्साहित करणे

या सेंटर ऑफ एक्सलन्स च्या निर्मितीसाठी फिनोलेक्स केबल्स लिमिटेड यांनी निधी काही कोटीचा नीधी उपलब्ध करून दिला असून सिमूसॉफ्ट टेक्नॉलॉजीस पुणे यांनी अंमलबजावणी भागीदार (implementation partner) यांनी काम पहिले आहे. या केंद्राला ऑटोमोटिव्ह स्किल डेव्हलपमेंट कौन्सिल ऑफ इंडिया नवी दिल्ली यांचेकडूनही मान्यता मिळालेली आहे.

सेंटर ऑफ एक्सलन्सच्या उद्घाटन सोहळ्याला विद्या प्रतिष्ठानचे विश्वस्त, उद्योगपती, विविध महाविद्यालयांचे प्राचार्य आणि कर्मचारी आणि विद्यार्थी उपस्थित होते. संस्थेचे विश्वस्त अजितदादा पवार, सौ. सुप्रिया सुळे, सौ. सुनेत्रा पवार, आणि मा. विठ्ठलशेठ मणियार आणि अॅड. अशोक प्रभुणे (उपाध्यक्ष), अॅड. नीलिमा गुजर (सचिव) युगेंद्र पवार (खजिनदार) आणि विद्या प्रतिष्ठानचे सदस्य व रजिस्ट्रार यांचे सेंटर ऑफ एक्सलन्स (COE) च्या स्थापनेच्या एकूण प्रक्रियेत महत्वपूर्ण मार्गदर्शन आहे.तर
प्रतापराव पवार, प्रा.बी. बी. आहुजा, सुनिल चोरे (कार्यकारी संचालक, सिमूसॉफ्ट टेक्नॉलॉजीस लिमिटेड पुणे), डॉ. आर. एस. बिचकर (प्राचार्य-व्हीपीकेबीआईटी), डॉ. सचिन भोसले (विभागप्रमुख- मेकॅनिकल इंजिनीअरिंग) आणि श्री. दादासाहेब रुपनवर (सहायक प्राध्यापक-मेकॅनिकल इंजिनीअरिंग) यांनी डिजिटल मॅन्युफॅक्चरिंग आणि रोबोटिक ऑटोमेशनमध्ये या सेंटर ऑफ एक्सलन्स (COE) च्या निर्मितीत उल्लेखनीय योगदान दिले आहे .

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here