विद्या प्रतिष्ठानचे कमलनयन बजाज इन्स्टिट्यूट ऑफ इंजिनियरिंग अँड टेक्नॉलॉजी, बारामती या महाविद्यालयाचा पुणे विद्यापीठ अंतर्गत अंतर महाविद्यालय ॲथलेटीक्स स्पर्धेमध्ये हॅमर थ्रो (मुले) स्पर्धेमध्ये द्वितीय क्रमांक

0
178

विद्या प्रतिष्ठानचे कमलनयन बजाज इन्स्टिट्यूट ऑफ इंजिनियरिंग अँड टेक्नॉलॉजी, बारामती या महाविद्यालयाचा पुणे विद्यापीठ अंतर्गत अंतर महाविद्यालय ॲथलेटीक्स स्पर्धेमध्ये हॅमर थ्रो (मुले) स्पर्धेमध्ये द्वितीय क्रमांक
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ अंतर्गत अंतरमहाविद्यालय हॅमर थ्रो (मुले) या स्पर्धा २१ व २२ ऑक्टो २०२३ रोजी विद्यापीठाच्या खाशाबा जाधव क्रिडांगणावर संपन्न झाल्या. या स्पर्धेमध्ये या महाविद्यालयाचा कु. गणराज घुले याने पुणे विद्यापीठ अंतर्गत अंतरमहाविद्यालयीन ॲथलेटीक्स स्पर्धेमध्ये हॅमर थ्रो (मुले) या क्रीडा प्रकारामध्ये द्वितीय क्रमांक मिळवून सलग दोन वेळा या विद्यार्थ्याने महाविद्यालयाचा नावलौखिक वाढविला आहे. तसेच त्याची विभागीय स्पर्धेसाठी निवड झाली आहे.
या स्पर्धेसाठी मा. प्राचार्य, डॉ. आर. एस. बिचकर यांनी त्याला प्रेरणा देऊन सर्वोतोपरी सहकार्य व मदत केली, तसेच क्रीडा मार्गदर्शक श्री. संतोष जानकर यांनी त्याला मार्गदर्शन केले. विद्यार्थ्यांच्या या यशाबद्दल संस्थेच्या विश्वस्त सुनेत्रा पवार, उपाध्यक्ष अॅड. श्री. अशोक प्रभुणे, सचिव अॅड. निलीमाताई गुजर, खजिनदार श्री. युगेंद्र पवार, विश्वस्त डॉ. राजीव शहा, श्री, मंदार सिकची, श्री. किरण गुजर, रजिस्टार कर्नल श्री. श्रीश कंभोज, तसेच सर्व विद्यार्थी, शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारीवर्ग या सर्वानी त्याचे विशेष कौतुक केले व पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here