विद्या प्रतिष्ठानचे कमलनयन बजाज इन्स्टिट्यूट ऑफ इंजिनिअरिंग अँड टेक्नॉलॉजी बारामती येथे संगणक अभियांत्रिकी शाखेच्या विद्यार्थ्यांची पालक सभा

0
12

विद्या प्रतिष्ठानचे कमलनयन बजाज इन्स्टिट्यूट ऑफ इंजिनिअरिंग अँड टेक्नॉलॉजी बारामती येथे संगणक अभियांत्रिकी शाखेच्या विद्यार्थ्यांची पालक सभा यशस्वी संपन्न
विद्या प्रतिष्ठानचे कमलनयन बजाज इन्स्टिट्यूट ऑफ इंजिनिअरिंग अँड टेक्नॉलॉजी महाविद्यालय बारामती येथे संगणक अभियांत्रिकी शाखेच्या विद्यार्थ्यांची पालक सभा महाविद्यालयाच्या मुख्य सभागृहामध्ये यशस्वी संपन्न झाली. या सभेत महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. आर. एस. बिचकर, रजिस्ट्रार डॉ. राजवीर शास्त्री, शैक्षणिक अधिष्ठाता डॉ. सचिन भोसले तर पालक प्रातिनिधिक स्वरूपात जितेंद्र छाजेड, रेणुका देशमुख यांची विशेष उपस्थिती होती. यावेळी पालक सभेचे औचित्य साधून संगणक विभागातील गुणवंत विद्यार्थी तसेच त्यांना मार्गदर्शन करणारे आणि विभागाच्या प्रगतीसाठी व मानांकनासाठी अहोरात्र कष्ट घेणाऱ्या प्राध्यापकांचा सत्कार व्यासपीठावरील मान्यवरांच्या शुभहस्ते करण्यात आला. डॉ. ज्ञानकमल छाजेड यांनी आपला विभाग NBA मान्यता प्राप्त असून विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी संगणक विभागामार्फत व महाविद्यालयामार्फत राबविले जाणारे विविध शैक्षणिक, सामाजिक, क्रीडा विषयक उपक्रम तसेच महाविद्यालयात विद्यार्थ्यांना दिल्या जाणाऱ्या पायाभूत सेवा सुविधा यांची इथंभूत माहिती उपस्थितांना दिली. विभागामध्ये विद्यार्थ्यांची गुणवत्ता वाढावी म्हणून NPTEL courses, IIT/COEP Virtual Labs,CESA विद्यार्थी असोसिएशन, प्राध्यापकांचे Youtube चॅनेल यासारखे अनेक उपक्रम राबविले जातात. या उपक्रमामध्ये आपला पाल्य सहभाग घेतो की नाही हे त्याच्या पालकांना समजावे तसेच आपल्या पाल्याची शैक्षणिक प्रगती समजावी, पालक आणि शिक्षक यांच्यामध्ये सुसंवाद घडावा यासाठी या कार्यक्रमाचे आयोजन केले असल्याचे विभागप्रमुख डॉ. सौ. ज्ञानकमल छाजेड यांनी यावेळी सांगितले. उपस्थित पालक सभेला मार्गदर्शन करताना महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. आर. एस. बिचकर यांनी नमूद केले की, या महाविद्यालयात दिल्या जाणाऱ्या पायाभूत सेवा सुविधा या आंतरराष्ट्रीय दर्जाच्या आहेत. येथील अद्यावत प्रयोगशाळा, सेवा सुविधा, अनुभवी प्राध्यापकवर्ग यांचा विद्यार्थ्यांनी जास्तीत जास्त उपयोग करून घेऊन स्वतःला सक्षम बनवलं पाहिजे तसेच चांगले ज्ञान आणि अद्यावत कौशल्य आत्मसात करून स्वतःचे व्यावसाय उभे केले पाहिजेत. त्याचप्रमाणे या महाविद्यालयाचा विद्यार्थी हा एक चांगला अभियंता तर घडेलच परंतु तो समाजामधील एक चांगला सुज्ञ नागरिक घडला पाहिजे अशी भावना त्यांनी या मार्गदर्शनपर भाषणातून व्यक्त केली. महाविद्यालयाचे शैक्षणिक अधिष्ठाता डॉ. सचिन भोसले यांनी पालकसभा हि शिक्षकांसाठीची फार मोठी ऊर्जा असते अशी भावना व्यक्त केली.
उपस्थित पालक सभेचे प्रतिनिधी म्हणून प्रातिनिधिक स्वरूपात जितेंद्र छाजेड, रेणुका देशमुख, ओमी मॅडम, या पालकांनी आपले मनोगत व्यक्त केले. महाविद्यालय विद्यार्थ्यांसाठी करत असलेल्या उपक्रमांचे कौतुक केले आणि काही सूचनाही केल्या. त्यानंतर गुणवंत विद्यार्थी नेहा छाजेड, यांनी Google developer ग्रुपच्या प्रतिनिधी म्हणून काम करत १५० हुन अधिक विद्यार्थांनी Google developer ग्रुपच्या वतीने GEN-AI कोर्ससाठी सहभाग घेतल्याचे सांगितले. तसेच गुणवंत विद्यार्थी अमन व्यास, श्रेया गायकवाड, विना मधुरे, वैष्णवी मोरे, सई देशमुख यांनीही आपले मनोगत व्यक्त केले.
या कार्यक्रमाचे संपूर्ण नियोजन प्रा. राजाराम अंबोले यांनी केले व प्रास्ताविक सौ. मोनाली मोरे यांनी, तर सूत्रसंचालन सौ. प्रिया शेलार यांनी केले. सौ. मोनाली मोरे यांनी उपस्थित पालकांचे व मान्यवरांचे आभार व्यक्त केले. सभेच्या यशस्वी आयोजनासाठी संगणक विभागाच्या सर्वच शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी यांनी मोलाचे सहकार्य केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here