विद्या प्रतिष्ठानचे कमलनयन बजाज इन्स्टिट्यूट ऑफ इंजिनिअरिंग अँड टेक्नॉलॉजी, बारामती या महाविद्यालयाला जल्लोष २०२४ युवक महोत्सव स्पर्धेत १३ वेगवेगळ्या कलाप्रकारात पारितोषिके व जनरल चॅम्पियनशीप
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ पुणे, विद्यार्थी विकास मंडळ व शारदाबाई पवार महिला महाविद्यालय, शारदानगर माळेगाव यांच्या संयुक्त विद्यमाने १९ सप्टें २०२४ रोजी आंतर महाविद्यालयीन जल्लोष २०२४ हा युवक महोत्सव साजरा करण्यात आला. या महोत्सवामध्ये वेगवेगळ्या स्पर्धा घेण्यात आल्या. या स्पर्धेमध्ये महाविद्यालयाला लोकनृत्य प्रथम क्रमांक, पाश्चिमात्त्य समूह नृत्य- प्रथम क्रमांक, लोक आर्केस्ट्रा प्रथम क्रमांक, वैयक्तीक शास्त्रीय नृत्य द्वितीय क्रमांक-संस्कृती लोणाकर, भित्तीपत्रक तयार करणे द्वितीय क्रमांक- सौरभ पाटील, मातीकाम द्वितीय क्रमांक-रचित उगलकर, मूक अभिनय- द्वितीय क्रमांक, प्रश्नमंजूषा- द्वितीय क्रमांक, नक्कला करणे तृतीय क्रमांक-सार्थक बारवकर, पाश्चिमात्त्य वैयक्तीक नृत्य तृतीय क्रमांक-सिद्धांत पाठक, एकांकिका- तृतीय क्रमांक, प्रहसन- तृतीय क्रमांक अशा वेगवेगळ्या १३ कलाप्रकारात पारितोषिके मिळाले. यासाठी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. रा. स. बिचकर विद्यार्थी कल्याण कक्ष अधिकारी डॉ. अनिल पाटील, सांस्कृतिक समन्वयक प्रा. पल्लवी बोके, क्रीडा मार्गदर्शक डॉ. बिपीन पाटील तसेच कुसुमांजली जगताप यासर्वांचे अत्यंत मोलाचे मार्गदर्शन व सहकार्य लाभले. संस्थेचे सर्वच विश्वस्त, रजिष्टार तसेच सर्व विद्यार्थी व प्राध्यापकांनी या विद्यार्थ्यांचे विशेष कौतुक केले व पुढील भावी वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.
Home Uncategorized विद्या प्रतिष्ठानचे कमलनयन बजाज इन्स्टिट्यूट ऑफ इंजिनिअरिंग अँड टेक्नॉलॉजी, बारामती या महाविद्यालयाला...