वारकरी शिक्षणातून यशाकडे वाटचाल – प्रेम सिद्धार्थ उघडे यांची प्रेरणादायी कहाणी
पांगरे (ता. करमाळा, जि. सोलापूर) येथील प्रेम सिद्धार्थ उघडे हा तरुण आपल्या कर्तबगारीमुळे व चिकाटीमुळे अनेकांसाठी प्रेरणास्थान ठरत आहे. वडील सिद्धार्थ प्रल्हाद उघडे यांचे निधन २०२२ साली झाले. त्यानंतर संपूर्ण कुटुंबाचा भार प्रेमवर आला. आई नूतन सिद्धार्थ उघडे यांनी मुलांचे पालनपोषण करत त्यांना शिक्षणात पुढे नेले.
प्रेमने इयत्ता सातवीपासून ते अकरावीपर्यंत बाहेर काम करून पखवाद शिकलं. घर सांभाळत शिक्षण आणि पखवाद या कलाविष्कारात त्याने प्राविण्य मिळवलं. सध्या त्याचा लहान भाऊ प्रतीक सिद्धार्थ उघडे इयत्ता अकरावीत शिक्षण घेत आहे.
गेल्या पाच वर्षांपासून प्रेम श्री क्षेत्र मांदळी येथे ओम ब्रह्म चैतन्य आत्मारामगिरी बाबा वारकरी शिक्षण संस्था येथे शिक्षण घेत आहे. ह. भ. प. वाणीभूषण सोमनाथजी महाराज गांगर्डे व ह. भ. प. संकेतजी महाराज इंगवले यांच्या आशीर्वादाने व आई-वडिलांच्या स्मृतीतून प्रेरणा घेऊन त्याने परीक्षेत यश संपादन केले आहे.
वारकरी परंपरेचे संस्कार, आईच्या संघर्षातून मिळालेली शिकवण आणि गुरूंचे आशीर्वाद यांच्या बळावर प्रेम सिद्धार्थ उघडे यशस्वी आयुष्याकडे वाटचाल करत असून त्याच्या चिकाटीला स्थानिक पातळीवरून भरभरून दाद मिळत

