लडकत स्कूल ऑफ फाउंडेशनच्या विद्यार्थ्यांची राज्य व जिल्हा स्तरावर दमदार यशाची भरारी
बारामती : “मेहनतीला यशाची साथ मिळतेच” हे पुन्हा एकदा सिद्ध करत लडकत स्कूल ऑफ फाउंडेशन, बारामती येथील दोन विद्यार्थ्यांनी स्केटिंग आणि बुद्धिबळ या क्रीडा प्रकारात अभूतपूर्व कामगिरी करत बारामतीचे नाव उज्ज्वल केले आहे.
इयत्ता ८ वीतील देवांग भणगे या हुशार विद्यार्थ्याने पुणे जिल्हा स्तरावरील स्केटिंग स्पर्धेत पहिला क्रमांक पटकावून थेट राज्यस्तरीय स्पर्धेसाठी निवड मिळवली आहे. तर इयत्ता ६ वीतील बुद्धिबळपटू स्वप्नजीत शितोळे याने बुद्धिबळाच्या पटावर अप्रतिम खेळी करत जिल्हा स्तरावर आपले वर्चस्व सिद्ध केले आहे.
या यशामागे शाळेचे मार्गदर्शक संचालक नामदेव लडकत, गणेश लडकत, संचालिका शुभांगी लडकत व प्रियांका लडकत यांचे सातत्यपूर्ण प्रयत्न आणि प्रोत्साहन आहे. तसेच मुख्याध्यापक प्रा. रामचंद्र वाघ, तानाजी गवळी, प्रफुल्ल आखाडे यांचे भक्कम पाठबळ व क्रीडा शिक्षक अनिल काशिद यांचे विशेष मार्गदर्शन या विद्यार्थ्यांच्या यशाला कारणीभूत ठरले आहे.
शाळेच्या वतीने या दोन्ही विद्यार्थ्यांचा विशेष सत्कार करून त्यांचे मनःपूर्वक अभिनंदन करण्यात आले. पुढील राज्यस्तरीय स्पर्धांसाठी शाळा परिवारातर्फे त्यांना हार्दिक शुभेच्छा देण्यात आल्या आहे
