रोहित पवारांचे खोचक ट्विट चर्चेत

0
178
रोहित पवारांचे खोचक ट्विट चर्चेत

रोहित पवारांचे खोचक ट्विट चर्चेत – महाराष्ट्राच्या नकाशाच्या मध्ये शरद पवारांचा फोटो, त्यांच्याभोवती काही लोक उभे; नकाशाच्या बाहेरच्या बाजूला चार भुंकणारे कुत्रे, फोटोने आणि कवितेने घातलाय धुमाकूळ

अजित पवार यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेसच्या नऊ आमदारांनी शिंदे-फडणवीस सरकारला पाठिंबा जाहीर करून रविवारी मंत्रीपदाची शपथ घेतली. यात खुद्द अजित पवार यांना सरकारमध्ये दुसरे उपमुख्यमंत्री म्हणून पद मिळालं आहे. या पार्श्वभूमीवर एकीकडे अजित पवार गटाकडून ४० हून जास्त आमदारांचा पाठिंबा असल्याचा दावा केला जात असताना दुसरीकडे असाच दावा शरद पवार गटाकडूनही केला जात आहे. या बंडखोरीनंतर दोन्ही गटांकडून एकमेकांवर आता टीका सुरू झाली असून त्यासंदर्भात राष्ट्रवादीच्या शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनी आज खोचक ट्वीट केलं आहे.

रोहित पवारांचं खोचक ट्वीट!

रोहित पवारांनी केलेल्या खोचक ट्वीटमध्ये एक फोटो शेअर करण्यात आला आहे. या फोटोमध्ये महाराष्ट्राच्या नकाशाच्या मध्ये शरद पवारांचा फोटो लावण्यात आला असून त्यांच्याभोवती काही लोक उभे असल्याचं दिसत आहे. या नकाशाच्या बाहेरच्या बाजूला चार कुत्रे भुंकत असल्याचं या फोटोमध्ये दाखवण्यात आलं आहे.

रोहित पवारांनी या ट्वीटमध्ये एक कविता पोस्ट केली आहे. त्यातून सध्याच्या राजकीय स्थितीवर त्यांनी भाष्य केलं आहे.

आज या दारात… उद्या त्या दारात…
पण एक दिवस लोकांकडं जावंच लागेल
मग लोकांना काय सांगणार?
तोंड कसं दाखवणार?
काल तर कडवा विरोध होता..
मग आज अचानक गळ्यात गळा कसा?
तो कोणता गळ आहे…
ज्या गळाला लागला मासा!
तुमच्या या चिखलात आम्ही का चालायचं?
रोजचीच चिखलफेक बघत का बसायचं?
अरे कुठं गेली तत्व अन् कुठे गेला विचार?
किती दिवस आम्ही हेच ऐकायचं?
जगण्याची, विचारांची बदलत चाललीय भाषा..
आता कुणाकडून करायची जनतेने आशा?
भरवशाच्या म्हशीलाच झालाय टोणगा..
कोणता पक्ष… कोणता विचार.. अन् कसली निष्ठा..
इथं पसरलीय बरबटलेल्या राजकारणाची विष्ठा..
कालची भाषा एक होती… आज भलतंच बरळत आहेत…
स्वार्थासाठी अनेकजण दात खाऊन पळत आहेत.
कुठेय आपला तो सुसंस्कृत महाराष्ट्र… अन् कुठेय परंपरा?
निर्लज्जपणाचा झाला कळस…
तुम्हाला येत नाही याची किळस?
मत ज्यांची घ्यायची… त्यांचीच चेष्टा करायची
ही कोणती रित?
ज्या पिढीला आम्ही डोक्यावर मिरवली..
ती देशाला विचार देणारी पिढी आज कुठे हरवली?
शिव-शाहू-फुले-आंबेडकर…
तुम्ही महाराष्ट्र घडवला…
तुमच्या पुरोगामी विचारांच रोपटं इथं रुजवलं..
पण आज याच रोपट्यावर होतेय का विखारी पावसाचं सिंचन?
हे होत असेल तर रोखायचं कुणी?
विष पसरवणाऱ्याला थोपवायचं कुणी?
त्यासाठी साहेब….
लोकहिताचं शस्त्र तर आहेच तुमच्या हाती
आता तुम्हीच उठा…
अन मैदानात उतरा…
शेकडो… हजारो… लाखो… करोडो हात देतील तुम्हाला साथ..
त्यात माझेही असतील दोन हात..

अशी पोस्ट रोहित पवारांनी केली आहे.

Previous articleअडीचशे वर्षांपूर्वी आणि आज बारभाईंचे कारस्थान
Next articleखोटं बोललो तर पवारांची अवलाद सांगणार नाही – अजित पवार
Bhavnagari
मी संपादक श्री.संतोष नारायण शिंदे बारामती इंदापूर भिगवन फलटण सातारा सांगली सह संपूर्ण महाराष्ट्र व विविध राज्यातून भारत देशातून दिल्ली मुंबई नागपूर गोवा विदर्भ पश्चिम महाराष्ट्र खानदेश उत्तर प्रदेश बंगाल विविध राज्यातून भावनगरी या वेबपेजच्या माध्यमातून सामाजिक, सार्वजनिक, सांस्कृतिक, क्रीडा, आरोग्यदायी, शेती, विविध विषयक जनहितार्थ वेब पेज पोर्टल वरती लोकहितार्थ बातमी, लेख जनोपयोगी प्रकारचे कथा-कथन कविता, सांस्कृतिक, क्रीडा विविध विषयावरती लेखन या भावनगरी वेब पेजच्या माध्यमातून जनहितार्थ प्रकाशित करत आहे...

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here