रोटरी क्लब ऑफ बारामती तर्फे शनिवारी दोन मॅजिक शो चे आयोजन
बारामती :- रोटरी क्लब ऑफ बारामती यंदा सुवर्णमहोत्सवी वर्ष साजरे करीत आहे. हे विशेष वर्ष म्हणून रोटरी क्लब विविध इव्हेंट्सचे आयोजन करीत आहे. बारामती रोटरी क्लबने शनिवारी “मॅजिक शो” चे आयोजन केले आहे. जादूगार जितेंद्र रघुवीर यांचा विश्व प्रसिद्ध वर्ल्ड फेमस] मॅजिक शोचे बारामतीमध्ये आयोजन रोटरी क्लब बारामती यांनी केले आहे. गेल्या ८५ वर्षांमध्ये २८ देशांमध्ये १५ हजार १०० हाऊसफुल्ल मॅजिक शो नंतर आतां आपल्या बारामती शहरात शो होत आहे. जादूगार जितेंद्र रघुवीर यांचा मॅजिक शो बारामती मधील लहान मुलांसाठी तसेच सर्व वयोगटासाठी अशा दोन मॅजिक-शोंचे आयोजन करण्यात आले आहे. सदरच्या मॅजिक शो चे आयोजन ग. दि. मा. सभागृह, विद्यानगरी, बारामती येथे शनिवार दि.३ फेब्रुवारी रोजी सकाळी ११:०० वाजता आणि सायंकाळी ५:०० वाजता असे दोन शो आयोजित करण्यात आले आहेत.
सदर मॅजिक शो ची तिकीटे व्ही आर इलेक्ट्रॉनिक्स भिगवण रोड बारामती येथे उपलब्ध करण्यात आलेली आहेत. इतर अधिक माहितीसाठी ८६००७८७०००, ९४२२५१९०३५ या क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन रोटरी क्लबच्या केले आहे.
रोटरी क्लब कायमच समाज उपयोगी कार्य करीत असते, या मॅजिक-शो च्या माध्यमातून आपल्या बारामती परिसरातील विद्यार्थ्यांना त्यांच्या नेहमीच्या पेक्षां अधिकची वेगळी करमणुक मिळावी या हेतूने हे मॅजिक शो आयोजित केले आहेत. जास्तीत जास्त मुले तसेच पालकांना मॅजिक शो पहातां यावा यासाठी २ शो चे आयोजन केले आहे. तरी याचा जास्तीत जास्त लाभ नागरिकांनी घ्यावा, अशी माहिती रोटरी क्लबच्या अध्यक्षा दर्शना गुजर यांनी दिली.