रूई गावाचा अभिमान – अभिजीत रामदास चौधर यांचा UPSC यशाचा जल्लोष!
रूई गावाच्या यशाच्या शिरपेचात आज एक मानाचा तुरा अधिकच खोवला गेला आहे! गावाची शान, शौर्य आणि स्वाभिमान जपणाऱ्या रामदास चौधर पाटलांचे चिरंजीव अभिजीत रामदास चौधर यांनी केंद्रीय लोकसेवा आयोग (UPSC) परीक्षेत देशात 487 वा क्रमांक पटकावत IAS/IPS सेवा मिळवली आहे. त्यांच्या या गौरवशाली यशाबद्दल त्यांचे हार्दिक अभिनंदन!

अभिजीतच्या जिद्दीला, कष्टाला आणि चिकाटीला मनःपूर्वक सलाम!
हा आनंद साजरा करण्यासाठी काल सायंकाळी संपूर्ण रूई गाव व वंजारवाडी एकवटले! गावकऱ्यांच्या वतीने भव्य मिरवणूक काढण्यात आली. ढोल-ताशांच्या गजरात, अभिजीतच्या नावाचा जयघोष करत गावकऱ्यांनी त्याला खांद्यावर घेत गावात फेरी मारली.
यानंतर एक भव्य सन्मान सोहळा पार पडला ज्यामध्ये गावचे मान्यवर, शिक्षकवर्ग, मित्रमंडळी, एमआयडीसी परिसरातील नागरिक – सगळ्यांनी एकच सुर लावला:
“अभिजीत, तू आमचा अभिमान आहेस!”
गावात शिक्षणाच्या वाटचालीला नवा आत्मविश्वास देणाऱ्या या यशामुळे अनेक तरुणांना प्रेरणा मिळणार आहे. अभिजीतने आपल्या कुटुंबाचे, गावाचे आणि संपूर्ण तालुक्याचे नाव उज्वल केले आहे. गावाने ही जंगी स्वागत व मिरवणुकीचे आयोजन करून त्याच्या या आनंदाला गगनात मावेन असा आनंद उत्सव साजरा केला.
अभिजीत, तुझ्या पुढील वाटचालीसाठी साप्ताहिक भावनगरी च्या वतीने मनःपूर्वक शुभेच्छा! तू याच जोमाने देशसेवा करशील याचा आम्हाला पूर्ण विश्वास आहे.
