राष्ट्रीय डाक सप्ताह २०२५ : पोस्ट ऑफिसची भूमिका ठरतेय लोकजीवनातील विश्वासार्ह साथीदार :
अधिक्षक – श्री सुदाम साबळे
भारत सरकारच्या डाक विभागाकडून यावर्षी ६ ते १० ऑक्टोबरदरम्यान ‘राष्ट्रीय डाक सप्ताह २०२५’ साजरा केला जाणार आहे. या निमित्ताने देशभरातील १.६५ लाख टपाल कार्यालयांद्वारे विविध योजना, सेवा आणि आधुनिक डिजिटल उपक्रम जनतेपर्यंत पोहोचवले जाणार आहेत. अशी माहिती आयोजित पत्रकार परिषदेत अधीक्षक डाकघर बारामती विभाग प्रमुख श्री सुदाम साबळे यांनी दिले यावेळी उपाधिक्षक श्री घायाळ व पोस्ट ऑफिसच्या संबंधित अधिकारी उपस्थित होत.यावेळी पत्रकारांना वरिल माहिती देण्यात आली.
आजच्या डिजिटल युगात पोस्ट ऑफिस केवळ पत्रव्यवहारापुरते मर्यादित राहिलेले नाही, तर ते बचत, विमा, निवृत्तीवेतन, पैसा पाठविणे, ई-कॉमर्स सेवा आणि ग्रामीण भागातील बँकिंगपर्यंत सर्वांगीण योगदान देत आहे. त्यामुळे पोस्ट ऑफिस ग्रामीण तसेच शहरी समाजजीवनातील एक विश्वासार्ह आर्थिक व सामाजिक केंद्र म्हणून उभे आहे.
राष्ट्रीय डाक सप्ताहातील महत्त्वाचे मुद्दे :
सुकन्या समृद्धी योजना (SSY) – मुलींच्या शिक्षणासाठी व भविष्यासाठी ८% व्याजदर व कर लाभ (८०C) उपलब्ध.
आधार सेवा – डाक विभागाद्वारे नागरिकांना आधार नोंदणी व अपडेटची सुविधा.
डिजिटल इंडिया – प्रत्येक शाखेत रिअल-टाईम ट्रॅकिंग, OTP आधारित व्यवहार, डिजिटल पेमेंट्स उपलब्ध.
विमा योजना – ग्रामीण व शहरी भागासाठी परवडणाऱ्या विमा योजना.
पार्सल सेवा – ई-कॉमर्सच्या युगात घरबसल्या सुरक्षित वितरण.
संपूर्ण भारतभर जोडणी – दुर्गम भागातसुद्धा पैसा पाठविणे व मिळविण्याची खात्रीशीर सेवा.
या सर्व उपक्रमांमुळे डाक विभाग आज ‘पारंपरिक पत्र व पार्सल सेवा’ सोबतच आधुनिक डिजिटल मित्र म्हणूनही लोकांच्या आयुष्यात महत्त्वपूर्ण भूमिका बजावत आहे. विशेष म्हणजे, ग्रामीण भागात बँकिंग सेवा पोहोचविण्यासाठी आणि समाजातील प्रत्येक घटकापर्यंत शासनाच्या योजना नेण्यासाठी पोस्ट ऑफिस सर्वाधिक महत्त्वाची भूमिका निभावत आहे.
त्यामुळे राष्ट्रीय डाक सप्ताह ही केवळ औपचारिकता नसून, ‘जनतेसाठी लोकसेवा’ या तत्त्वाची उजळणी आहे.