राष्ट्रपुरुष श्रीमंत सुभेदार मल्हारराव होळकर यांचे जन्मगावी भव्यदिव्य स्मारक, मल्हारसृष्टी उभी राहणार
सभापती प्रा.राम शिंदेसर
श्रीमंत सुभेदार मल्हारराव होळकर यांच्या जन्मस्थळाच्या विकासासाठी पाच कोटींचा निधी दिला जाणार
-ग्रामविकास व पंचायतराज मंत्री तथा सोलापूर जिल्हा पालकमंत्री जयकुमार गोरे
सातारा दि.16 – राष्ट्रपुरुष श्रीमंत सुभेदार मल्हारराव होळकर यांचा इतिहास दैदीप्यमान असा आहे. मुरूम येथील त्यांच्या जन्मस्थळाच्या विकासासाठी प्रयत्न केले जातील, अशी ग्वाही विधान परिषदेचे सभापती राम शिंदे यांनी दिली.
जिल्हा परिषद सातारा व ग्रामपंचायत मुरूम यांच्या संयुक्त विद्यमाने श्रीमंत सुभेदार मल्हारराव होळकर यांची 332 वी जयंती मुरूम तालुका फलटण येथे साजरी करण्यात आली. यावेळी विधान परिषदेचे सभापती श्री शिंदे बोलत होते. याप्रसंगी ग्रामविकास व पंचायतराज मंत्री जयकुमार गोरे, मा. खासदार रणजितसिंह निंबाळकर,मा.मंत्री महादेव जानकर ,आमदार सचिन पाटील, आमदार उत्तमराव जानकर, माजी आमदार ॲड.रामहरी रूपनवर,संजूबाबा निंबाळकर, प्रशासकीय अधिकारी आदी उपस्थित होते.

श्रीमंत सुभेदार मल्हारराव होळकर यांच्या जन्मस्थळाच्या विकासासाठी 30 कोटींचा आराखडा तयार करण्यात आला आहे. या आराखड्यानुसार लवकरच कामाला सुरुवात होईल, असे सांगून विधान परिषदेचे सभापती श्री. शिंदे म्हणाले, मल्हारराव होळकर यांच्या जन्मस्थळाबरोबर येथे मल्हारसृष्टी उभारण्यासाठी ही प्रयत्न केला जाईल. यासाठी जमीन कमी पडत असल्यास तीही उपलब्ध करून देणे विषयी सांगण्यात येईल. हे जन्मस्थळ युवा पिढीसाठी ऊर्जा व प्रेरणास्त्रोत ठरेल अशा पद्धतीने काम केले जाईल.

वीर पुरुषांचे कार्य युवा पिढी समोर येणे महत्त्वाचे आहे. यासाठी श्रीमंत सुभेदार मल्हारराव होळकर यांच्या जन्मस्थळाच्या विकासासाठी ग्रामविकास विभागाकडून पाच कोटींचा निधी तातडीने दिला जाईल, अशी घोषणा ग्रामविकास व पंचायराज मंत्री श्री. गोरे यांनी कार्यक्रमाप्रसंगी केली. ते पुढे म्हणाले, मुरूम गावचा तीर्थक्षेत्राचा प्रस्ताव तातडीने सादर करावा याला ब वर्ग पर्यटन स्थळाचा दर्जा दिला जाईल. या माध्यमातून मुरूम व परिसराचा चांगला विकास केला जाईल. पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांनी देशातील मंदिरांबरोबरच संस्कृतीचेही जतन केले असल्याचेही मंत्री श्री गोरे यांनी कार्यक्रमाप्रसंगी सांगितले.
श्रीमंत सुभेदार मल्हारराव होळकर यांच्या जन्मस्थळाच्या विकासासाठी आमदार फंडातून भरीव निधी दिला जाईल, असे आमदार श्री पाटील यांनी यावेळी सांगितले. कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी संयोजन समितीच्या माध्यमातून शंकरराव माडकर माणिकराव सोनवलकर, अँड.गोविंद देवकाते, योगेश संकपाळ व फलटण,बारामती नीरा,जेजुरी, लोणंद व पुणे सातारा जिल्ह्यातील विशेषतःमुरूम, खामगाव,कुसूर ग्रामस्थांनी टीमने प्रयत्न केले.
कार्यक्रमाचे स्वागत भाषण ॲड.गोविंद देवकाते,प्रास्ताविक शंकरराव माडकर व सूत्रसंचालन संजय भोसले सरांनी केले

