सर्वांना नमस्कार
मी एक बारामतीचा सुज्ञ नागरिक बोलत आहे आज बोलण्याचा अट्टाहास आहे असं समजलं तरी चालेल त्याचं कारण असे आहे की आपल्या बारामती नगरीचा विकास हा गेले 30 वर्षांमध्ये माननीय अजितदादा पवार यांच्या माध्यमातून होत आहे आणि तो अजून मोठ्या प्रमाणात केला जाणार आहे.
बारामती मध्ये वेगवेगळ्या विभागामध्ये वेगवेगळे गार्डन्स तयार केलेले आहेत बारामती शहराचा शिरपेचात मानाचा तुरा लावणारा रस्ता म्हणजे बारामती भिगवण रोड या रोडचं खूप चांगल्या पद्धतीने काम चाललेला आहे आणि आता डिव्हायडर बदलून त्यामध्ये खूप चांगल्या पद्धतीचे काम पण झालं परंतु यामध्ये असलेली झाडे लावल्यापासून आत्तापर्यंत कधीही योग्य पद्धतीने त्याची छाटणी झालेली नाही एवढ्या दिवस याच्याकडे दुर्लक्ष केलं जात होतं त्याचं कारण की ते डिव्हायडर छोट्या उंचीचे होते परंतु आत्ता मेन भिगवन रोड आणि सर्विस रोड याच्यामध्ये निर्माण केले जात असलेले पार्किंग वेगवेगळे लहान मुलांचे खेळण्याचे स्पॉट असतील तिथे लावलेली झाडे असेल या सर्व गोष्टीचा जर विचार केला तर मध्ये असलेल्या डिव्हायडरची झाडे एकदम चुकीच्या पद्धतीने कट केली जातात त्यामुळे त्या रस्त्याचे पूर्णपणे सौंदर्य नष्ट होत चालले आहे कदाचित कोण लक्ष देत असेल नसेल माहित नाही परंतु आज माननीय दादांच्या माध्यमातून एवढ्या मोठ्या प्रमाणात ही काम चाललेली असताना ह्या छोट्या मोठ्या गोष्टीकडे लक्ष देण्यासाठी दादांकडे कदाचित वेळ नसणार आहे आणि ह्या गोष्टीसाठी वेळ द्यावा ही अपेक्षा करणं एक सुज्ञ नागरिक म्हणून आपल्याला पण योग्य वाटत नाही परंतु माझी एक नम्र कळकळीची विनंती आहे की ज्या पद्धतीने हे काम चाललेलं आहे यासाठी माननीय CO साहेब किंवा नगरपालिकेच्या इतर कर्मचाऱ्यांनी यामध्ये लक्ष घालावं आणि त्या झाडांची छाटणी व्यवस्थित रित्या योग्य पद्धतीने एकसारखी कशी होईल याकडे थोडं लक्ष द्यावे द्यावे जेणेकरून त्या रस्त्याचं सौंदर्य अजून खुलून दिसेल.
आपलाच एक सुज्ञ नागरिक
बारामती