माजी सैनिकांना इंड्युरन्स टेक्नॉलॉजीज लिमिटेड, चाकण येथे नोकरीची संधी

0
7

माजी सैनिकांना इंड्युरन्स टेक्नॉलॉजीज लिमिटेड, चाकण येथे नोकरीची संधी

पुणे, दि. ३० : इंड्युरन्स टेक्नॉलॉजीज लिमिटेड, चाकण, येथील अॅल्युमिनियम डाय कास्टिंग आणि मशीनिंग (उत्पादन) सुविधा केंद्रात काम करण्यासाठी १०० पेक्षा अधिक माजी सैनिकांची नियुक्ती करण्यात येणार आहे. माजी सैनिकांची नियुक्ती प्लांटमध्ये ग्रॅव्हिटी डाय कास्टिंग, गेट कटिंग, ऑटोमेशन कंपोनेंट्सच्या फेटिंग मशीन शॉपसारख्या कामांमध्ये करण्यात येईल. ३० ते ४५ वर्षे वयाची अट असून, इयत्ता १० वी किंवा १२ वी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. तांत्रिक पात्रता असलेल्या उमेदवारांना प्राधान्य देण्यात येईल, असे जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी, लेफ्टनंट कर्नल हंगे स. दै. (नि.) यांनी कळविले आहे.

उमेदवारांच्या मुलाखतीचे मूल्यांकन, कौशल्ये, अनुभव आणि पात्रता पाहून २५ हजार ते ४० हजार वेतन आणि इतर फायदे देण्यात येतील. तसेच कंपनीच्या नियमानुसार उमेदवारांना भविष्य निर्वाह निधी/कामगार भरपाई धोरण/वैयक्तिक अपघात धोरण आणि गट वैद्यकीय दाव्याच्या धोरणांतर्गत लाभ मिळतील. अधिक माहितीसाठी इच्छुक माजी सैनिकांनी जिल्हा सैनिक कल्याण कार्यालय, पुणे येथे संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी, लेफ्टनंट कर्नल हंगे स. दै. (नि.) यांनी प्रसिध्दी पत्रकान्वये केले आहे.
०००००

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here