माँ से बेटी सवाई” – आत्मनिर्भर मातांचा आणि कर्तृत्ववान कन्यांचा गौरव”

0
64

“माँ से बेटी सवाई” – आत्मनिर्भर मातांचा आणि कर्तृत्ववान कन्यांचा गौरव”

बारामती │ ऑल इंडिया लिनेस क्लब ऑफ बारामतीच्या वतीने “माँ से बेटी सवाई” या आगळ्या-वेगळ्या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले. यामध्ये स्वतः आत्मनिर्भर आणि स्वावलंबी असलेल्या मातांनी आपल्या कन्येलाही सक्षमतेच्या शिखरावर पोहोचवले आहे, अशा मातांना आणि त्यांच्या कर्तृत्ववान कन्यांना गौरविण्यात आले.

हा विशेष सन्मान सोहळा विविध क्षेत्रांतील यशस्वी मुलींना समर्पित होता. उद्योग, कला, शिक्षण, वैद्यकीय, शेती अशा विविध क्षेत्रांमध्ये स्वतःची ओळख निर्माण करणाऱ्या एकूण 13 माँ-बेटींचा सत्कार करण्यात आला. सत्कारार्थींमध्ये वैष्णवी ननवरे, सेजल ओसवाल, ऐश्वर्या जामदार, शिवानी तावरे, दिव्यश्री गांधी, तेजश्री मोरे, भाग्यश्री शिंदे, संध्या सस्ते, पुनम जाधव, अमृता भापकर, सुनेत्रा शिंदे, ज्योती भोसले आणि सिद्धी संगई यांचा समावेश होता.

आईच्या संघर्षाची भावनिक कहाणी…
कार्यक्रमात मनोगत व्यक्त करताना भाग्यश्री शिंदे भावूक होत म्हणाली, “अपार कष्ट करून आईने मला शिकवले, कोणाच्याही मताचा विचार न करता कायम माझ्यावर विश्वास ठेवला. हा विश्वास मी सदैव टिकवून ठेवेन. जसा तुला माझा अभिमान आहे, तसाच मला तुझा अभिमान वाटतो. आपण आईपेक्षा मोठे होऊ शकत नाही, पण आईला नेहमी वाटते की ‘माँ से बेटी सवाई’ असावी.”

प्रमुख मान्यवरांचा सन्माननीय सहभाग
या कार्यक्रमास बारामतीच्या नगराध्यक्षा सौ. पौर्णिमाताई तावरे, लिनेस क्लबच्या ड्रि. पास्ट प्रे. लि. सुमनमामी जाचक, लि. ड्रि. पास्ट प्रेसिडेंट धनश्री गांधी, तसेच लिनेस क्लब बारामतीच्या अध्यक्षा उज्वलाताई शिंदे आणि सर्व लिनेस सभासद उपस्थित होते.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक लि. मनिषा शिंदे यांनी केले, तर आभार प्रदर्शन लिनेस संगीता भापकर यांनी मानले. सूत्रसंचालन लिनेस पल्लवी शहा, सराफ, लिनेस रिनल शहा आणि लिनेस पुनम जाधव यांनी उत्तमरित्या पार पाडले.

“माँ से बेटी सवाई” या विशेष उपक्रमाच्या माध्यमातून मातांच्या संघर्षाला आणि मुलींच्या कर्तृत्वाला एक नवा सन्मान मिळाला. हा उपक्रम समाजातील इतर महिलांसाठीही प्रेरणादायी ठरेल, यात शंका नाही!”

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here