महाराष्ट्र पोलिसांचा चरित्र पडताळणी ॲप बंद?

0
44

महाराष्ट्र पोलिसांचा चरित्र पडताळणी ॲप बंद?
पंधरा दिवसापासून नागरिक हैराण! अलिबाग:-( जयपाल पाटील) महाराष्ट्र पोलीस दलाकडून चरित्राचा दाखला मिळविण्यासाठी महाराष्ट्रातील मागील 15 दिवसापासून नागरिक. हैराण झाले असून तातडीने महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री नामदार देवेंद्र फडणवीस यांनी लक्ष घालावे अशी नागरिकांची मागणी आहे. चरित्र पडताळणी दाखला सरकारी नोकरी, भारतीय सैन्य दल, हवाई दल, नेव्ही, कस्टम व केंद्र आणि महाराष्ट्र शासनाचे विविध पुरस्कारासाठी चरित्राचा दाखला असावा लागतोच. यासाठी पूर्वी आपण राहतो तेथील पोलीस ठाण्यात अर्ज करून 100 रुपये फी भरली की पोलीस ठाण्यात असलेल्या क्राईम रजिस्टर मध्ये दाखला मागणार्‍याला कोणत्या गुन्ह्यात शिक्षा झाली असेल तर चारित्र्याच्या दाखल्यात तशी नोंद येते,आणि त्या गुन्ह्यात अपीलामध्ये म्हणजेच वरिष्ठ न्यायालयात निर्दोष मुक्तता झाली असेल तर दाखला देण्याच्या दिवशी कोणताही गुन्ह्याची नोंद नाही. असा दाखला त्वरित मिळतो. देशभरामध्ये संगणकाचा बोलबाला झाल्याने महाराष्ट्र पोलीस ही मागे कसे त्यांनी महाराष्ट्रातील सर्व पोलीस ठाण्यामध्ये क्राइम रजिस्टर ची नोंद, मुंबई येथील मुख्य कार्यालयात एकाच ॲप मध्ये केली. शासनाच्या कोणत्याही सुविधा केंद्रात अर्ज महाराष्ट्र पोलिसांच्या चारित्र्याच्या दाखल्याची फी भरली की तो स्थानिक पोलीस स्टेशनला अर्ज जातो. तेथे तपासणी करून जिल्हा पोलीस मुख्यालयातून तो अर्ज करणाऱ्यास प्राप्त होतो, मात्र स्थानिक पोलीस स्टेशनमध्ये तपासणीस गेल्यावर आपल्या मोबाईलवर मेसेज येतो. तो पुढे जिल्हा मुख्यालयात गेल्यानंतरही आपला दाखला तयार असल्याचाही मेसेज आपल्या मोबाईलवर येतो. महाराष्ट्र पोलिसांनी हा ॲप सुरू केल्यापासून कधीही बंद पडला नव्हता. मात्र मागील 15 दिवसापासून हा एरर येतोय म्हणजेच बंदच आहे. ज्यामुळे महाराष्ट्रातील हजारो नागरिकांना तरी त्यानां दाखला हवा असल्याने मुळात तो जिथे दाखल करावयाचा असल्याने,दिवस पुढे जात असून सर्व जण काळजीत पडले आहेत. यामुळे जनता विद्यार्थी, नोकरी साठी रुजु होणारे पोलीस ठाण्यात फेऱ्या मारून सध्या हैराण झाले आहेत. यासाठी महाराष्ट्र गृह खात्याने अत्यंत त्वरेने महाराष्ट्रभरचारित्राच्या दाखल्याची झालेली अडचण युद्ध पातळीवर सुरक्षित करावी. अशी जनतेची इच्छा आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here