महसूल विषयक कार्यशाळेचे सोमवारी आयोजन
पुणे, दि. ९: जिल्हाधिकारी कार्यालयाच्यावतीने गणेश कला क्रीडामंच येथे जिल्हाधिकारी श्री जितेंद्र डूडी यांच्या प्रमुख उपस्थितीत सकाळी ९.३० वा. महसूल विषयक एकदिवसीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे.
या कार्यशाळेत ई-फेरफार, ई-हक्क, ई-चावडी, ई-पिकपाहणी, ई-क्युजेकोर्ट, ई-कोर्ट, डी-४, शासकीय जागा मागणी, सेवादूत, महाखनिज, महामहसूल, आपले सरकार, पीजी पोर्टल, १०० दिवस कृती आराखडा आदी विषयावर मार्गदर्शन करण्यात येणार आहे. या कार्यशाळेला मुद्रांक जिल्हाधिकारी,उपजिल्हाधिकारी, प्रांताधिकारी अधीक्षक भूमी अभिलेख, सहायक अधीक्षक भूमी अभिलेख तहसीलदार, मंडळ अधिकारी, तलाठी,सेतू चालक व
संबंधित कर्मचारी उपस्थित राहणार आहेत. अशी माहिती निवासी उपजिल्हाधिकारी ज्योती कदम यांनी दिली.
