मराठी पत्रकार दिनानिमित्त दर्पणकार आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांना प्रशासनाकडून अभिवादन
बारामती दि.६ : मराठी पत्रकार दिनानिमित्त दर्पणकार आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांच्या प्रतिमेस उपविभागीय अधिकारी वैभव नावडकर यांनी उप माहिती कार्यालय, नवीन प्रशासकीय भवन येथे पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.
या कार्यक्रमास अपर पोलीस अधीक्षक गणेश बिराजदार, तहसीलदार गणेश शिंदे, सहायक मोटार वाहन निरीक्षक प्रियंका सस्ते, प्रज्ञा ओमासे, उप माहिती कार्यालयातील कर्मचारी, पत्रकार उपस्थित होते.
यावेळी श्री.नावडकर व श्री. बिराजदार यांनी पत्रकारांना शुभेच्छा दिल्या.