बाल लैंगिक अत्याचार प्रकरणी आरोपी यांस २० वर्षे सश्रम कारावासाची शिक्षा….

0
173

बाल लैंगिक अत्याचार प्रकरणी आरोपी यांस २० वर्षे सश्रम कारावासाची शिक्षा

प्रकाश किसन अडागळे रा पारगाव सालमालु गाडाळवाडी ता. दौड, जि. पुणे यास बारामती येथील मे. अति. जिल्हा व सत्र न्यायाधीश जे. ए. शेख सो यानी आज बाल लैंगिक अत्याचार प्रकरणी २० वर्षे सश्रम कारावासाची शिक्षा सुनावली.

या प्रकरणाची हकीकत

सदरचा गुन्हा हा ता. २३ / ०३ / २०२१ रोजी दुपारी २.३० ते ३.०० वाजताचे दरम्यान पिडीता ही पारगाव. सालुमालु गाडाळवाडी येथील किराणा मालाचे दुकानात मेहदीची पुडी आणनेसाठी गेली असता आरोपी नामे प्रकाश किसन अडागळे रा. पारगाव सालुमालु गाडाळवाडी ता. दौंड जि. पुणे तेथे आला. आरोपी याने पिडीतेला स्वतःच्या घरात नेवून पिडीतेवर लैंगिक अत्याचार केला अशी फिर्याद पिडीतेच्या आईने यवत पोलीस स्टेशन येथे केली होती.

सदर प्रकरणाचा तपास यवत पोलीस स्टेशनचे तत्कालीन पोलीस उपनिरिक्षक एस.ए. नागरगोजे यांनी केला व आरोपी याच्या विरुध्द बाल लैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायदा कलम ४,८,१२ व भा.द.वि. कलम ३७६.५०६ प्रमाणे दोषारोपपत्र दाखल केले. आरोपी न्यायालयीन बंदी होता.

सदर प्रकरणांमध्ये सरकार पक्षातर्फे विशेष सरकारी वकील सुनिल ईश्वर वसेकर यांनी सरकार पक्षातर्फे ९ साक्षीदार तपासले. त्यामध्ये फिर्यादी म्हणजेच पिडीतेची आई यांनी न्यायालयात साक्ष दिली. सदर पिडीता ही ६ वर्षाची अल्पवयीन असूनही तिने झालेली घटना न्यायालयात सविस्तर सांगितली. तसेच सदर खटल्यामध्ये मुलीच्या वयाबाबतचा पुरावा नसल्याने डॉक्टरांची साक्ष घेण्यात आली. त्यांची साक्ष खटल्याकामी महत्वपुर्ण ठरलेली आहे. तसेच डॉ. कार्तिक यांची साक्ष व न्याय वैदयकीय पुरावा महत्वाचा ठरला. तसेच इतर साक्षीदारांच्या साक्षी महत्वाच्या ठरल्या

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here