बारामती विधानसभा मतदार संघामध्ये निवडणुकीसाठी साहित्याचे वितरण

0
25

बारामती विधानसभा मतदार संघामध्ये निवडणुकीसाठी साहित्याचे वितरण
बारामती विधानसभा मतदारसंघात मतदानासाठी प्रशासन सज्ज
बारामती दि .१९ : बारामती विधानसभा मतदारसंघात २० नोव्हेंबर रोजी होणाऱ्या मतदानासाठी आज पोलीस बंदोबस्तात मतदान साहित्याचे वितरण करण्यात आले असून सर्व साहित्य सुस्थितीत मतदान केंद्रावर पोहचले अशी माहिती निवडणूक निर्णय अधिकारी वैभव नावडकर यांनी दिली. बारामती विधानसभा मतदारसंघात एकूण मतदार संख्या ३ लाख ७५ हजार ७१२ आहे. त्यापैकी १ लाख ९० हजार ८४१ पुरुष मतदार, १ लाख ८४ हजार २९० महिला मतदार, २१ इतर मतदार आहेत.

बारामती मतदारसंघांमध्ये एकूण ३८६ मतदान केंद्र आहेत. त्यासाठी ३९ टेबल ची व्यवस्था करून ३२६ बॅलेट युनिट, ४६३ कंट्रोल युनिट, ५०१ व्हीव्हीपॅट यंत्राचे वितरण वखार महामंडळ, औद्योगिक वसाहत (MIDC) बारामती येथून केंद्रनिहाय मतदान साहित्याचे वितरण करण्यात आले. ३८६ मतदान केंद्रावर एकूण १ हजार ९४३ मतदान कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. मतदान केंद्रावर अधिकारी आणि कर्मचारी यांना नेण्यासाठी एकूण ४७ एस.टी. बसेस ,१५ खाजगी मिनी बसेस, ९ जीपची व्यवस्था करण्यात आली आहे. बारामती करिता ४० क्षेत्रीय अधिकारी कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली असून त्यांना मतदान केंद्रावर जाण्यासाठी ३९ जीपची व्यवस्था करण्यात आली आहे.

बारामती मतदारसंघांमध्ये १९३ मतदान केंद्रावर वेब कास्टिंग करण्यात येणार आहे. मतदान प्रक्रिया सुरळीत पार पाडण्यासाठी पोलीस यंत्रणा सज्ज झाली असून यामध्ये ३० पेक्षा जास्त पोलीस अधिकारी, ३८६ पोलीस कर्मचारी, बॉर्डर सिक्युरिटी फोर्स १ प्लाटून, आरपीएफ हरियाणाचे २ प्लाटून मिळून ७० जवान नियुक्त करण्यात आले आहेत.

मतदारांच्या स्वागतासाठी विशेष मतदान केंद्र तयार करण्यात आले आहेत. यामध्ये मॉडेल मतदान केंद्र जिल्हा परिषद शाळा दत्तवाडी, गुणवडी, पिंक मतदान केंद्र सामाजिक न्याय विभाग मुलींचे शासकीय वसतिगृह इमारत जळोची, दिव्यांग मतदान केंद्र जिल्हा परिषद शाळा माळेगाव बुद्रुक, युवक मतदान केंद्र महाराष्ट्र एज्युकेशन हायस्कूल बा.न.प. बारामती, विशेष मतदान केंद्र जिल्हा परिषद शाळा डोर्लेवाडी येथे स्थापन केले आहे.

मतदान केंद्रावरील सुविधा

पिण्याचे पाणी
मदत कक्ष
स्वच्छतागृह
वीज
वैद्यकीय कीट, ओआरएस पावडर आणि केंद्रावर वैद्यकीय प्रतिनिधी
मतदारांच्या मदतीसाठी स्वयंसेवकांच्या नेमणुका
सर्व मतदान केंद्रावर दिव्यांग तसेच वयोवृद्ध मतदारांसाठी व्हिलचेअर व रॅम्पची सुविधा
दिव्यांग, ज्येष्ठ नागरिक आणि महिला मतदारांसाठी वेगळ्या रांगेची व्यवस्था
अंध मतदारासाठी मतदान केंद्रावरील सूचनाफलक आणि मतदान यादी ब्रेल लिपीमध्ये तयार करण्यात आली आहे.
मतदार यंत्रावर ब्रेल लिपी मुद्रित केली असल्याने अंध मतदारांना कोणाच्याही मदती खेरीज मतदान करता येणे शक्य आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here