विद्या प्रतिष्ठानचे कमल नयन बजाज अभियांत्रिकी व तंत्रज्ञान महाविद्यालय बारामती येथील विद्यार्थ्यांची बहुराष्ट्रीय कंपनीमध्ये नोकरीसाठी निवड
विद्या प्रतिष्ठानचे कमल नयन बजाज अभियांत्रिकी व तंत्रज्ञान बारामती येथील महाविद्यालयाच्या सात विद्यार्थ्यांची ॲसेंचर या बहुराष्ट्रीय कंपनीमध्ये नोकरीसाठी निवड झाली आहे. या कंपनीने आर्टीफिसेल इंटीलिजन्स आणि डेटा सायन्स, संगणक, माहिती व तंत्रज्ञान या तीन विद्याशाखेच्या विद्यार्थ्यांची मुलाखत घेऊन सदर विद्यार्थ्यांची ४. ६ लाखाच्या वार्षिक पॅकेजसाठी निवड केली आहे. आर्टीफिसेल इंटीलिजन्स आणि डेटा सायन्स शाखेतील – वेदांत राऊत, तर संगणक शाखेतील- अनिकेत रोहोकलें, रितेश खोरे, सुजाता गवळी, वैष्णवी साखरे तसेच माहिती व तंत्रज्ञान शाखेतील अथर्व जाधव, रोहित खलाटे यांची निवड झाली आहे. सदर विद्यार्थ्यांची अभियांत्रिकी शाखेची पदवी अद्याप पूर्ण होण्या अगोदरच कॅम्पस प्लेसमेंटमधून त्यांची नोकरीसाठी निवड झाली आहे. प्राचार्य डॉ. आर. एस. बिचकर, डॉ. विशाल कोरे, प्रा. सुरज कुंभार, प्रा. संतोष करे, प्रा. व्यंकटेश रामपूरकर, प्रा. प्रदीप घोरपडे यांनी या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. या कामासाठी चारुदत्त दाते, दादा तावरे, गणेश निंबाळकर, वैभव भोसले, रुपाली झारगड, सोनाली जगताप व प्रवीण नगरे यांचे सहकार्य लाभले. विद्या प्रतिष्ठान संस्थेचे विश्वस्त व कार्यकारी मंडळाचे सर्व सदस्य यांनी या यशस्वी विद्यार्थ्याचे अभिनंदन व कौतुक केले आहे