बारामती बाजार समिती मध्ये कांदा व लिंबास उच्चांकी दर

0
41

बारामती –

बारामती बाजार समिती मध्ये कांदा व लिंबास उच्चांकी दर

दि. २८/८/२०२४ रोजी सुपे उपबाजार येथील लिलावात लिंबास प्रति किलो रू. ९२/- असा उच्चांकी दर मिळाला असुन किमान प्रति किलो दर रू. ६५/- व सरासरी प्रति किलो दर रू. ८०/- असे दर निघाले. तर जळोची उपबाजार येथील भाजी मार्केट मध्ये बुधवार दि. २८ ऑगस्ट रोजी कांद्यास प्रति क्किंटल कमाल रू. ४६००/- व सरासरी दर रू. ३४५०/- असे दर निघाले. पुणे शहर जवळ असल्याने लिंबास मोठ्या प्रमाणात मागणी आहे. तसेच लिंबु खरेदीसाठी बाहेरील खरेदीदार येत आहेत. परपेठेत लिंबु व काद्यांस मागणी असल्याने आणि आवक कमी असल्याने उच्चांकी दर निघत आहेत अशी माहिती सभापती सुनिल पवार व उपसभापती निलेश लडकत यांनी दिली.


सुपे उपबाजार येथे दर बुधवारी लिंबु लिलाव होत असतात. बारामती तालुक्यासह दौंड, पुरंदर या भागातील शेतकरी लिंबु विक्रीस घेऊन येत आहेत. लिंबु व कांद्यास स्थानिक बाजारपेठेत किरकोळ विक्रीसाठी आणि परपेठेत ही मागणी वाढत असल्याने आणखी दर वाढतील असे अपेक्षित आहे. परंतु चांगल्या मालास उच्च दर मिळत असल्याने लिंबु व कांदा उत्पादक शेतक-यांनी आपला माल ग्रेडींग व सॉर्टींग करून आणावा म्हणजे आणखी जादा दर मिळतील. समितीचे बाजार आवारात शेतमालाचे अचुक माप, लिलावापुर्वी गोणीचे वजन व त्याच दिवशी पट्टी तसेच उघड लिलाव पद्धतीने विक्री व समितीचे नियंत्रण यामुळेच शेतक-यांचा आर्थिक फायदा होत आहे अशी माहिती सचिव अरविंद जगताप यांनी दिली. शेतक-यांनी आपला माल बारामती बाजार समितीचे आवारात विक्रीस आणावा असे आवाहन समिती तर्फे करणेत येत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here