बारामती नाभिक समाजाची महत्त्वपूर्ण खासदार सुनेत्रा पवार यांची भेट…!

0
36

बारामती नाभिक समाजाची महत्त्वपूर्ण खासदार सुनेत्रा पवार यांची भेट…!

प्रतिनिधी: बारामती, 16 नोव्हेंबर 2024: बारामती शहर व तालुक्यातील ग्रामीण भागातील नाभिक समाजाच्या बांधवांनी 16 नोव्हेंबर 2024 रोजी सकाळी सहयोग बंगला,

बारामती येथे आयोजित करण्यात आलेल्या विशेष बैठकीत सहभाग नोंदवला. या बैठकीस विधानसभेतील बारामती मतदारसंघाचे आमदार अजित पवार यांच्या प्रचारार्थ पाठिंबा दर्शविण्यासाठी नाभिक समाजाने एकत्र येत आपला निर्णय घोषित केला.

या वेळी अजित पवार यांच्या सुविद्य पत्नी व खासदार सुनेत्रा पवार यांनी नाभिक समाज बांधवांशी संवाद साधला. समाजाच्या समस्या व त्यावरील उपाय यावर चर्चा करताना त्यांनी समाजाच्या विकासासाठी अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली कार्य सुरू राहील असे आश्वासन दिले. तालुक्यातील ग्रामीण व शहरी नाभिक समाज बांधवांनी संघटित होऊन समाजाच्या प्रश्नांवर एकत्रित प्रयत्न करावे, असा संदेश यावेळी देण्यात आला.

नाभिक संघटनेच्या वतीने अजित पवार यांना पुन्हा पाठिंबा देण्याचा निर्धार या बैठकीत करण्यात आला. या कार्यक्रमात उपस्थित नाभिक महामंडळ व संघटन एकजूट दर्शवली आणि पुढील काळात देखील समाजाच्या प्रगतीसाठी योगदान देण्याचे वचन दिले.

अजित पवार यांच्या बहिण विजया पाटील यांच्याशी नाभिक समाजाने अजित दादाच्या पाठीशी ठाम राहू अशी वचन बदता: दिली

बारामती शहर व तालुक्यातील विविध भागांतील नाभिक बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here