बारामती नगरपरिषद हद्दीतील लाभार्थ्यांना विविध कोर्स पूर्ण प्रमाणपत्र वाटप समारंभ संपन्न…

बारामती नगरपरिषद हद्दीतील लाभार्थ्यांना विविध कोर्स पूर्ण प्रमाणपत्र वाटप

0
182

आज दिनांक 30 नोव्हेंबर 2023 रोजी बारामती नगरपरिषद , बारामती शहर उपजीविका केंद्र , इंदापूर चौक, बारामती येथे

दीनदयाल अंतोदय योजना राष्ट्रीय नागरी उपजीविका अभियान अंतर्गत कौशल्य प्रशिक्षण सोमेश्वर एज्युकेशन ट्रेनिंग सेंटर ,बारामती यांच्या मार्फ़त
ब्युटी पार्लर कोर्स,
शिवणकाम कोर्स
संगणक दुरुस्ती तंत्रज्ञ कोर्स यशस्वी पणे पूर्ण केलेल्या बारामती नगरपरिषद हद्दीतील लाभार्थ्यांना प्रमाणपत्र वाटप समारंभ पार पडला.
सर्वांचे मनःपूर्वक अभिनंदन…..

बारामती नगर परिषद, महिला बाल कल्याण विभाग यांचे मार्फत
बारामती मधील महिलांसाठी मोफत स्पोकन इंग्लिश क्लास
साठी प्रवेश सुरु झाले आहेत.

बेसिक पासून इंग्रजी शिकवले जाईल,
लिखाण, वाचन, संभाषण कौशल्य विकसित करून घेतले जाईल.

कोर्स चा उपयोग
👉🏻स्वतः व्यवसायात यशस्वी होण्यासाठी.
👉🏻घरी मुलांचा अभ्यास घेऊन त्यांच्या शंका निरसन करण्यासाठी.
👉🏻वर्षानुवर्ष मुलांचे ट्यूषण खर्च वाचवण्यासाठी.
👉🏻पुढील शिक्षणासाठी.
व इतर अनेक गरजांसाठी इंग्रजी भाषा शिकणे आता काळाची गरज बनले आहे. चला तर मग आपण मागे का?
आजच आपला मोफत प्रवेश निश्चित करा व इंग्रजी भाषेची भीती मनातून कायमची काढून टाका…

अधिक माहितीसाठी संपर्क साधावा – 8788414136/ 8308775852

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here