बारामती नगरपरिषद निवडणूक २०२५ : चिन्हवाटपासाठी उमेदवारांना २६ नोव्हेंबरला बोलावणे — निवडणूक प्रक्रियेत वेग

0
31

बारामती │ आगामी बारामती नगरपरिषद सार्वत्रिक निवडणूक

बारामती नगरपरिषद निवडणूक २०२५ : चिन्हवाटपासाठी उमेदवारांना २६ नोव्हेंबरला बोलावणे — निवडणूक प्रक्रियेत वेग

बारामती │ आगामी बारामती नगरपरिषद सार्वत्रिक निवडणूक २०२५ च्या तयारीला आता अधिकृत वेग आला आहे. राज्य निवडणूक आयोगाने जाहीर केलेल्या कार्यक्रमानुसार १८ ते २१ नोव्हेंबरदरम्यान झालेल्या नामनिर्देशन प्रक्रियेची छाननी २२ नोव्हेंबरला पूर्ण झाली असून तत्काळ पुढील टप्प्याला म्हणजे २६ रोजी चिन्ह वाटपाला सुरुवात करण्यात येत असल्याची अधिकृत सूचना निवडणूक निर्णय अधिकारी डॉ. संगीता राजापूरकर यांनी दिली आहे.

निवेदनानुसार, नगरपरिषदेच्या गट व वार्डांच्या एकूण अध्यक्षपद व प्रभाग क्र. १ते २० मधील गठीत निवडणूक लढवणाऱ्या सर्व उमेदवारांनी दिनांक २६/११/२०२५ रोजी दुपारी १२:०० वाजता बारामती नगरपरिषदेत उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे. याच वेळी, सर्व उमेदवारांचे निवडणूक चिन्ह वाटपाची प्रक्रिया पार पडणार आहे.

तसेच उमेदवार स्वतः किंवा आपला अधिकृत प्रतिनिधी हजर राहणे आवश्यक असल्याचे सूचनापत्रात स्पष्ट करण्यात आले आहे.
दरम्यान, नामांकन अर्जांचा तपास पूर्ण झाल्यानंतर शहरात राजकीय हालचालींना वेग आला असून प्रत्येक प्रभागात उमेदवार कार्यकर्त्यांसह प्रचारयंत्रणेची बांधणी करताना दिसत आहेत.

चिन्हवाटप हा टप्पा पार पडल्यावर बारामतीतील निवडणुकीचा मुकाबला अधिक रंगतदार होण्याची चिन्हे दिसत असून, येत्या काही दिवसांत प्रचाराला जोर येणार असल्याचे राजकीय वर्तुळात म्हटले जात आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here