बारामती अंतरप्रेनर्स क्लबचा सामाजिक बांधिलकीचा आदर्श उपक्रम
बारामती एमआयडीसी येथील बारामती अंतरप्रेनर्स क्लब ने सामाजिक बांधिलकी जपत अतिवृष्टी व पुरामुळे मोठ्या संकटात सापडलेल्या गावकऱ्यांना मदतीचा हात दिला आहे. जीवनावश्यक वस्तूंचे किट तयार करून तब्बल ४१० कुटुंबियांना मदत पोहोचविण्यात आली.
ही मदत करमाळा, माढा, भूम-परांडा व बार्शी या तालुक्यातील पूरग्रस्त भागांत रविवारी ५ ऑक्टोबर रोजी पेन्सिल चौक, बारामती येथून टेम्पो रवाना करून देण्यात आली.
या उपक्रमात उद्योजक सचिन माने, अरुण म्हसवडे, कृष्णा ताटे, जालिंदर माघाडे, रमाकांत पाडोळे, संजय थोरात, पंढरीनाथ कांबळे आणि संजय गोलांडे आदी मान्यवर उपस्थित होते.
बारामती अंतरप्रेनर्स क्लब सामाजिक जबाबदारीची परंपरा जपत असतो. यानंतर पूर ओसरल्यानंतर रोगराईचा प्रादुर्भाव होऊ नये म्हणून गावोगावी औषधे, गोळ्या व प्राथमिक आरोग्य साहित्य पोहोचविण्याचाही संकल्प क्लबच्या उद्योजकांनी केला आहे.
बारामती अंतरप्रेनर्स क्लबचे हे कार्य म्हणजे संकट काळात समाजासाठी उभे राहण्याचा एक आदर्श आहे.